देशातील पहिले ‘आयडिया लॅब’ प्रशिक्षण केंद्र हरयाणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:12 AM2021-09-24T04:12:54+5:302021-09-24T04:12:54+5:30
डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे (डीवायपीआययु) आयोजित ‘एआयसीटीई आयडिया लॅब’ या प्राध्यापक विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कुमार बोलत होते. ...
डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे (डीवायपीआययु) आयोजित ‘एआयसीटीई आयडिया लॅब’ या प्राध्यापक विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कुमार बोलत होते. यावेळी एआयसीटीई ‘आयडीसी’चे सल्लागार डॉ. नीरज सक्सेना, ‘डीवायपीआययु’चे कुलगुरू प्रा. प्रभात रंजन, डॉ. अमरीश दुबे उपस्थित होते.
सक्सेना यांनी आयडिया लॅब संकल्पनेच्या निर्मिती मागील उद्दिष्टांची माहिती दिली, तसेच येणार काळ हा प्रामुख्याने ऑनलाइन शिक्षणाचा असणार आहे. त्यामुळे या बदलत्या शिक्षण पद्धतींशी अधिक सक्षमपणे विद्यार्थ्यांना जुळवून घेता यावे, यासाठी ‘एआयसीटीई’ नेहमीच प्रयत्नशील असणार आहे. आयडिया लॅब हा केवळ एक उपक्रम न राहता अतिशय कमी काळात त्याने एका चळवळीचे स्वरूप घेतले आहे. देशात प्रत्येक महाविद्यालयात एक आयडिया लॅब असावी, असेही सक्सेना यांनी यावेळी नमूद केले.