पुण्यात दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने घेतली फाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:55 PM2020-06-21T12:55:24+5:302020-06-21T12:57:15+5:30
सुरज सोनी हा ४ महिन्यांपूर्वी या सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता. सोसायटीच्या आवारातच ते एका खोलीत रहात होते.
पुणे : पुणे शहर व परिसरात सुरु झालेले आत्महत्येचे सत्र संपता संपत नसल्याचे रविवारी सकाळी उघड झाले़ रास्ता पेठेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाºया पतीने आत्महत्या केल्याचे पाहिल्यावर पत्नीनेही त्याच हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सुरज पालसिंग सोनी (वय २७) आणि अरुणा सुरज सोनी (वय २२, रा़ पदमजी पार्क, विश्राम सोसायटी, रास्ता पेठ) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुरज सोनी हा ४ महिन्यांपूर्वी या सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता. सोसायटीच्या आवारातच ते एका खोलीत रहात होते. सुरजचा गेल्या वर्षी अरुणाबरोबर प्रेमविवाह झाला होता. ते मुळचे नेपाळचे आहेत. काही दिवसांपूर्वी अरुणाचा भाऊ त्यांच्याकडे रहायला आला होता. दोघा पतीपत्नींमध्ये नेहमी वादविवाद होत असे. काल रात्री सुरज खोलीत झोपला होता, तर अरुणा व तिचा भाऊ बाहेर झोपले होते़ सकाळी उठल्याने मेव्हण्याने दरवाजा वाजविला तरी आतून दार न उघडल्याने त्याने खिडकीतून डोकावुन पाहिले तर सुरज याने पत्र्याच्या हुकाला गळफास घेतलेला दिसला़ त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला़ त्यानंतर त्याने अरुणाला, त्याच्या भावाला ही माहिती सांगून बोलावतो, असे म्हणून तो बाहेर पडला़ तो सुरजच्या भावाला घेऊन खोलीत आला तर अरुणानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. दोघांनीही ओढणीने पत्र्याच्या अँगलला गळफास घेतला.
या घटनेची माहिती मिळाल्यावर समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहेत. सुरजच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुखसागर नगरमध्ये शुक्रवारी एकाच कुटुंबातील पतीपत्नीने दोन मुलांना गळफास देऊन मारल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. शनिवारी सहकारनगर येथील एक चप्पल व्यावसायिक शुभम राजेंद्र बोबडे (वय २३, रा. नवजीवन सोसायटी, सहकारनगर) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर धायरी येथील व्यावसायिक स्वप्निल उत्तम रायकर (वय ४५, रा. शिवमल्हारनगर, रायकर मळा, धायरी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पिंपरीमध्ये गेल्या १५ दिवसात ३८ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.