रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे घरातून पळून आलेले जोडपे पोलिसांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:31+5:302021-07-31T04:12:31+5:30
पुणे : छत्तीसगडहून घरातून पळून आलेल्या जोडप्यास रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना गुरुवारी ...
पुणे : छत्तीसगडहून घरातून पळून आलेल्या जोडप्यास रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना गुरुवारी मिरज स्थानकावर घडली.
एक तरुण जोडपे घरात कुणाला न सांगता छत्तीसगडहून आधी मुंबईला आलं. तिथे काही काम नाही मिळालं म्हणून ते मिरज आले. मिरज स्थानकावर बराच वेळ आढळून आल्याने त्यांच्याकडे मुख्य तिकीट निरीक्षक नरसिंह लाल गुप्ता यांनी रेल्वे तिकीटची विचारणा केली. त्यावेळी त्यांनी तिकीट नसल्याचे सांगितले. अधिक माहिती विचारता उडवाउडवीची उत्तरे दिली. ही बाब मुख्य वाणिज्य निरीक्षक त्रिपुरारी कुमार यांना सांगण्यात आली. यावेळी त्यांनी अधिक चौकशी केल्यानंतर घरात कुणालाही न सांगता लग्न करून पळून आल्याचे सांगितले. यातील मुलाचे वय हे १९ आहे. तर मुलीचे वयदेखील १९ आहे. ही माहिती मिळताच व मुलावर छत्तीसगडमध्ये गुन्हा नोंद असल्याचे समजताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना मिरज लोहमार्ग पोलीस यांच्याकडे सुपूर्द केले.