उतारवयात माणसाला पुण्यकर्मच कामी- निवृत्तीमहाराज इंदोरीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:38 AM2018-10-28T00:38:47+5:302018-10-28T00:39:21+5:30
भाऊसाहेब मार्तंडराव शिंदे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम
कान्हूरमेसाई : तरुणपणी आपण सर्वांवरच हक्क गाजवू शकतो. मात्र पन्नाशीनंतर हक्क गाजवण्याचे दिवस संपतात. मुले-सुना सांगतील तेच ऐकण्याची वेळ येते. अशा वेळी पुण्यकर्म निश्चितच साथ देते. म्हणून दानधर्म पदरात पाडून घ्या, असे प्रतिपादन ह.भ. प. निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले.
कान्हूरमेसाई येथील माजी उपसभापती व पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय भाऊसाहेब (मामा ) मार्तंडराव शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त समाजप्रबोधनकार ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीपवळसे पाटील ,माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार, सभापती विश्वास आबा कोहकडे, दादासाहेब कोळपे, सविता बगाटे, शांताराम सोनवणे, राजेंद्र गावडे, सुभाष पोकळे , गुलाब धुमाळ, विक्रम पाचूदकर, सरपंच सर्जेराव खेडकर, मानसिंग पाचूदकर शेखर पाचूदकर, दत्ता पाचूदकर, मथाजी पोखरकर, बायडाबाई शिंदे , बबन शिंदे , संतोष शिंदे, पंडित शिंदे, बाळू शिंदे ,मनोज शिंदे, सतिश शिंदे, वंदना पुंडे, तुषार पाचूदकर, चेतन पाचंगे, ह.भ. प. मल्हारी महाराज शेवाळे, नाथामहाराज शेवाळे, मनोजमहाराज ढमाले, किसनमहाराज कदम, बाबुराव महाराज तळोले, डॉक्टर टेमगिरे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ‘ आजचा माणूस ईश्वराला विसरलेला आहे, ईश्वर आहे तुमच्या आमच्यात आहे, चांगले काम केलेच पाहिजेत. जो चांगले काम करतो त्याची चर्चा होते. स्वर्गीय भाऊसाहेब शिंदे यांनी जनतेची सेवा केली म्हूणून ते महान झाले.’ यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
शिंदे यांनी परिसरात जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मरावे परी कीर्ती रूपे उरावे ह्या म्हणी प्रमाणे त्यांचे कार्य होते . समाज जोडण्याचे काम त्यानी केले, आदरणीय भाऊसाहेब शिंदे यांनी हे कार्य केले म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी दिसत आहोत , जातीभेद करु नका गावचा विकास होणार नाही सर्व समाज मिळून मिसळून राहिला पाहिजे, असे इंदोरीकर यांनी सांगितले.