फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांची हात-पाय बांधून हत्या; ७ वर्षांनी आरोपीची कोर्टाकडून निर्दोष सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 02:27 PM2024-07-30T14:27:12+5:302024-07-30T15:00:34+5:30

लोणावळ्यात सात वर्षांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडात कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

Court acquitted the accused in the Lonavala double murder case | फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांची हात-पाय बांधून हत्या; ७ वर्षांनी आरोपीची कोर्टाकडून निर्दोष सुटका

फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांची हात-पाय बांधून हत्या; ७ वर्षांनी आरोपीची कोर्टाकडून निर्दोष सुटका

Lonavala double murder Case: सात वर्षांपूर्वी घडलेल्या लोणावळा दुहेरी हत्यांकाड प्रकरणात कोर्टानं महत्त्वाचा निकाल लागला आहे. दोन विद्यार्थ्यांच्या हत्या प्रकरणात कोर्टाने आरोपी सलीम शब्बीर शेखची निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्या अभावी शब्बीर शेखची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी हा अल्पवयीन होता. चोरीसाठी दोन विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली होती. मात्र चोरीचे आरोपच सिद्ध न झाल्याने कोर्टाने आरोपीची सुटका केली आहे.

दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी अडीच महिन्यानंतर सलीम शेख आणि आसिफ शेख  यांना अटक केली होती. दुसरा आरोपी अस्लम हा अल्पवयीन होता. त्यामुळे त्याची तेव्हाच मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर सात वर्षांनी सलीम शेखला कोर्टात हजर केल्यानंतर सोडण्यात आलं आहे. या प्रकरणात आरोपीला मोठी शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र चोरीचा आरोप सिद्ध न झाल्याने सलीम शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली.  

३ एप्रिल २०१७ रोजी ही घटना घडली होती. लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिकणारे सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे हे दोघेही भुशी धरणाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या डोंगरांमध्ये फिरायला गेले होते. त्यानंतर दोघांचेही मृतदेह आयएनएस शिवाजीजवळ सापडले. दोघांनाही विवस्त्र करुन त्यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला होता. दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्या होत्या. दोन्ही मृतदेहांचे हात-पाय बांधण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी आक्रमक होत आरोपींच्या अटकेची मागणी केली होती.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. तपासादरम्यान पोलिसांच्या खबऱ्याने यातील एका आरोपीने दारुच्या नशेत काही जणांकडे हत्येची कबुली दिल्याचे सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी अडीच महिन्यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. चोरीच्या उद्देशानं ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीनं पोलिसांच्या चौकशीत दिली होती.

हात-पाय बांधून केली हत्या

आसिफ आणि सलीम यांनी दोघांना एका निर्जनस्थळी पाहून त्यांच्याकडे आक्षेप घेत चौकशी सुरु केली. मात्र, आपण इथून लवकरच निघणार असल्याचे सार्थक सांगितले. त्यानंतर दोन्ही आरोपी तिथून निघून गेले आणि पाच मिनिटांनी पुन्हा आले. त्यांनी सार्थक आणि श्रुतीला जवळच्या झुडपात  गेले. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून आरोपीने आधी सार्थकला कपडे काढण्यास भाग पाडले आणि श्रुतीला मागे गेले. त्यामुळे सार्थकने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या हाणामारीत सार्थकचा मृत्यू झाला. श्रुतीने आरडाओरड सुरु केल्यानंतर आरोपींनी तिलाचा संपवण्याचे ठरवलं. आरोपींनी  कपड्याच्या सहाय्याने श्रुतीचे हात बांधले आणि दगडाने ठेचून तिची हत्या केली. या घटनेनंतर आरोपींनी दोन मोबाईल फोन आणि एक हजार रुपये रोख घेऊन पळ काढला.
 

Web Title: Court acquitted the accused in the Lonavala double murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.