पीडितेच्या मृत्यूनंतरही तिच्यावर बलात्कार करणा-याला सक्तमजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 07:28 PM2018-09-03T19:28:24+5:302018-09-03T19:31:56+5:30

न्यायालयाने पीडितेच्या डीएनऐ रिपोर्ट आणि तपासामध्ये आढळलेल्या साक्षीपुराव्यांचे आधारे तिच्यावर बलात्कार करणा-या पोल्ट्री फॉर्मच्या मालकाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

court gives 10 years jail to rapist even after the death of the victim | पीडितेच्या मृत्यूनंतरही तिच्यावर बलात्कार करणा-याला सक्तमजुरी 

पीडितेच्या मृत्यूनंतरही तिच्यावर बलात्कार करणा-याला सक्तमजुरी 

Next
ठळक मुद्देखटल्यादरम्यान झाले पीडित मुलीचे निधनजीवे मारण्याची धमकी देत केला होता पोल्ट्री चालकाने अत्याचार  

पुणे : बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर खटला सुरू असतानाच पीडितेचा मृत्यू झाला. मात्र तरी देखील न्यायालयाने पीडितेच्या डीएनऐ रिपोर्ट आणि तपासामध्ये आढळलेल्या साक्षीपुराव्यांचे आधारे तिच्यावर बलात्कार करणा-या पोल्ट्री फॉर्मच्या मालकाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला. 

        अरुण पोपटराव पिंगळे (वय ५३, रा. किवळे, ता. मावळ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित मुलीचे कुटुंबिय पिंगळे याच्या किवळे येथील पोल्ट्री फॉर्म आणि वीटभट्टीवर कामाला होते. पीडित मुलगी अशिक्षित असून पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांना खाद्य देण्याचे काम ती करीत. २०१४ साली दिवाळीच्या दरम्यान ती एकटी घरी असल्याचा फायदा घेत पिंगळे याने तिच्यावर बलात्कार केला होता. त्याबाबत कोणाला सांगितल्यास तिला जीवे ठार मारण्याची धमकी पिंगळे याने दिली. त्यामुळे तिने याबाबत कोणाला सांगितले नव्हते. त्यानंतर पिंगळे याने  अनेकवेळा तिच्यावर अत्याचार केला. 

      पीडित अशिक्षित असल्याने घटना घडलेली तारिख, वेळ तिला आठवत नव्हती. मात्र, सन २०१४ मध्ये दिवाळीच्या कालावधीत घटना घडल्याचे तिने सांगितले. त्यानुसार याबाबत पडघा पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आली. तो गुन्हा वडगाव मावळ पोलीस स्टेशनला वर्ग झाला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे  अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. डीएनए तपासणीमध्ये बाळ पिंगळे याचे असल्याचा निष्पन्न झाल्याचा पुरावा महत्त्वाचा ठरला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक इक्बाल जमाल शेख यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कर्मचारी डी. एल. धनवे आणि एस. एच. मोरे यांनी मदत केली. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन वर्षे कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. 

          घटनेच्या वेळी पिंगळे कर्तव्यावर असल्याचा दावा बचाव पक्षातर्फे  करण्यात आला. मात्र, हा दावा अ‍ॅड. अगरवाल यांनी खोडून काढला. डीएनएवर कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने भादवी कलम ३७६ (बलात्कार) नुसार ७ वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, भादवी कलम ५०६ (जीवे ठार मारण्याची धमकी देणे) नुसार १ वर्षे सक्तमजुरी, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पास्को) कलम ४ नुसार ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड आणि पास्को कलम ५ नुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. 

पीडितेच्या आईने दिली व्हीसीद्वारे साक्ष 

उलट तपासणी घेण्यापूर्वीच पीडित मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. तर आर्थिक अडचणीमुळे तिची आईही न्यायालयात हजर राहू शकली नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज येथील न्यायालयातून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी त्यांची साक्ष नोदवली.

तिने दिला होता बाळाला जन्म

दरम्यानच्या पिंगळे याने मजुरीचे पैसे न दिल्याने पीडिता आणि तिचे कुटुंबियांचे ठाणे जिल्ह्यातील पडघा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामासाठी स्थलांतरीत झाले होते. तेथे काही दिवसांनी पीडिता आजारी पडली. तिला दवाखान्यात नेल्यानंतर ती सहा महिन्याची गर्भवती असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी आईने चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने बाळाला देखील जन्म दिला होता. सध्या ते बाल ३ वर्षांचे झाले असून पीडितेचे आई वडिल त्याचा संभाळ करीत आहेत. 

Web Title: court gives 10 years jail to rapist even after the death of the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.