Pune: टीईटी घोटाळ्यातील आरोपीचे दागिने परत करण्याचा न्यायालयाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 12:43 IST2024-02-15T12:42:58+5:302024-02-15T12:43:10+5:30
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात अश्विनकुमार याला पोलिसांनी २० डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती....

Pune: टीईटी घोटाळ्यातील आरोपीचे दागिने परत करण्याचा न्यायालयाचा आदेश
पुणे : टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी अटक केलेल्या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नाेलाॅजी कंपनीचा प्रमुख अश्विनकुमार याच्या घरातून जप्त केलेले दागिने परत देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायाधीश व्ही.पी. खंदारे यांनी दिला आहे. वीस लाख रुपयांच्या बंधपत्रावर, तसेच खटल्याचा निकाल लागेपर्यंत दागिने न विकण्याच्या अटी-शर्तीवर हे दागिने परत देण्यात आले आहेत. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात अश्विनकुमार याला पोलिसांनी २० डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती.
अश्विन कुमार यांच्या बंगळुरू येथील घरातून पोलिसांनी दागिने जप्त केले होते. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तत्कालीन शिक्षण आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडूनही मोठा ऐवज जप्त केला होता. दरम्यान, याप्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने अश्विन कुमार याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. याप्रकरणी सायबर क्राइम पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले असून, हे प्रकरण दोषारोपपत्र निश्चितीसाठी प्रलंबित आहे. दरम्यान, अश्विन कुमारने ॲड. मिलिंद पवार, ॲड. अक्षय शिंदे, ॲड. हर्षवर्धन पवार यांच्यातर्फे न्यायालयात अर्ज दाखल करून पोलिसांनी जप्त केलेले दागिने परत मिळावे, अशी मागणी केली. न्यायालयाने अटी-शर्तींसह दागिने परत देण्याचा आदेश दिला.