सिनेमातील एखाद्या दृश्याप्रमाणे कॉलेजच्या तरुणीचा हात धरणा-याला न्यायालय म्हणते सुधर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 03:12 AM2017-09-17T03:12:30+5:302017-09-17T04:56:17+5:30
सिनेमातील एखाद्या दृश्याप्रमाणे कॉलेजच्या तरुणीचा भर रस्त्यात हात धरून माझ्यावर प्रेम करशील का, अशी प्रेमाची हाक देणा-या तरुणाला न्यायालयाने दोन वर्षांच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका करीत दिलासा दिला आहे.
पुणे : सिनेमातील एखाद्या दृश्याप्रमाणे कॉलेजच्या तरुणीचा भर रस्त्यात हात धरून माझ्यावर प्रेम करशील का, अशी प्रेमाची हाक देणा-या तरुणाला न्यायालयाने दोन वर्षांच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका करीत दिलासा दिला आहे. विनयभंगाच्या खटल्यामध्ये आरोपीला शिक्षा देण्याऐवजी न्यायालयाने त्याचे वय लक्षात घेऊन कायद्यातील प्रोबेशन आॅफ आॅफेन्डर अॅक्टनुसार त्याला सुधारण्याची संधी दिली.
न्यायालयाने त्याला तीन हजार रुपयांच्या बॉण्डवर चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर दोन वर्षांसाठी त्याची सुटका केली. दोन वर्षांच्या कालावधीत तो चांगला वागला नाही तर त्याला विनयभंगाच्या आणि बाललैंगिक प्रतिंबंधक कायदाच्या कलमानुसार पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातून येरवड्यातील २१ वर्षीय तरुणाची सुटका करण्यात आली आहे. जानेवारी २०१६मध्ये ही घटना घडली. येरवडा पोलिसांकडे दाखल फिर्यादीमध्ये, अल्पवयीन असलेली १७ वर्षांची मुलगी कॉलेजला निघाली होती. त्यावेळी तरूणाने तिचा पाठलाग केला. तिचा हात धरुन तुला सुखात ठेवेन माझ्याशी प्रेम करतेस का, अशी विचारणा केली, असे फिर्यादीत म्हटले होते. सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी या खटल्यात काम पाहिले.