येत्या रविवारपर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:20+5:302021-04-13T04:11:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ...

The court will be closed till next Sunday | येत्या रविवारपर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद

येत्या रविवारपर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या न्यायालयांना चार दिवसांची अतिरिक्त सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे रविवारपर्यंत न्यायालयीन कामकाज बंद राहणार आहे. मात्र सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाजाच्या वेळा देखील कमी करण्याचा निर्णय गेल्या आठवडयात घेण्यात आला आहे. दरम्यान, या आठवड्यात मंगळवारी आणि बुधवारी अशा दोन दिवशी सुट्ट्या (गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती) असल्याने चारच दिवस कामकाज होणार होते. मात्र, आता उर्वरित चार दिवस देखील कामकाज बंद ठेवणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सोमवार (दि.१२), गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी (दि. १५ ते १७) देखील न्यायालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सोमवारी (दि.१९) नियमितपणे सुनावणी होणार आहे.

दरम्यान, या सुट्टीच्या दिवशी तारखा असलेल्या दाव्यांना पुढील तारखा देण्यात आल्या आहेत. तसेच चार अतिरिक्त सुट्या दिल्याने चार दिवसांचे कामकाज पुढे भरून काढायचे आहे. स्थानिक परिस्थितीनुसार चार दिवस अतिरिक्त कामकाज करण्यात यावे, असे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशात नमूद आहे. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून उच्च न्यायालयाने न्यायालयास सुट्टी दिली आहे. त्यामुळे आपण घरी सुरक्षित राहावे. न्यायालयीन कामकाजासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशन आणि दी पुणे फॅमिली कोर्ट असोसिएशनने वकील व पक्षकारांना केले आहे.

Web Title: The court will be closed till next Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.