लवासाच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यास काेर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 06:07 AM2020-12-10T06:07:55+5:302020-12-10T06:08:33+5:30

Lavasa News : पर्यावरण नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर बांधकाम व आता आर्थिक डबघाईला आलेल्या लवासा प्रकल्प लिलाव प्रक्रियेस अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.

Court's refusal to suspend Lavasa's auction process | लवासाच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यास काेर्टाचा नकार

लवासाच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यास काेर्टाचा नकार

Next

 मुंबई : पर्यावरण नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर बांधकाम व आता आर्थिक डबघाईला आलेल्या लवासा प्रकल्प लिलाव प्रक्रियेस अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. मात्र, लिलाव प्रक्रिया व अन्य व्यवहार हे सर्व न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असतील, असे या वेळी न्यायालयाने स्पष्ट केले.

पुण्यात हिल स्टेशनवर उभारलेला लवासा प्रकल्प अनेक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे चर्चेत राहिला. या प्रकल्पासाठी शेत जमिनी जबरदस्तीने बळकावल्या. राष्ट्रवादीचे शरद पवार  यांच्या कुटुंबीयांचे हितसंबंध होते व  खासदार सुप्रिया सुळे यांच्या कंपनीने प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यामुळे या प्रकल्पाला भूखंड मिळवून देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या वेळी जलसंपदामंत्री होते. त्यांनी पदाचा गैरवापर करून पर्यावरण नियम व अन्य नियम धाब्यावर बसवून या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे प्रकल्प बेकायदा ठरवून रद्द करा, अशी याचिका वकील नानासाहेब वसंतराव जाधव यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. प्रकल्प लिलावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे लिलावास स्थगिती द्या, अशी मागणी याचिकेत आहे. मात्र, महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी याचिकाकर्त्याला एवढी घाई का आहे, असा सवाल केला. 

वित्तसंस्थांचे साडेपाच हजार कोटी देणे
न्यायालयानेही याचिकेवर अंतिम सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. परंतु, त्यापूर्वी लिलाव झाला तर सर्व प्रक्रिया, अन्य व्यवहार न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहतील, असे स्पष्ट केले. दरम्यान, लवासा कॉर्पोरेशनला विविध वित्तसंस्थांचे सुमारे साडेपाच हजार कोटी देणे आहे. लवासात मालमत्ता खरेदी केलेल्यांचे चारशे कोटी रुपयांचे देणे आहे.
 

Web Title: Court's refusal to suspend Lavasa's auction process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.