अनैतिक संबंधातुन चुलत भावाचा खुन

By admin | Published: November 26, 2014 12:03 AM2014-11-26T00:03:15+5:302014-11-26T00:03:15+5:30

अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या तिच्या पतीचा म्हणजे चुलत भावाचा हिंगणो येथे राहणा-या भावानेच डोक्यात दगड घालुन आणि चाकुने वार करून 2क् नोव्हेंबरला खुन केला.

Cousin's murder of immorality | अनैतिक संबंधातुन चुलत भावाचा खुन

अनैतिक संबंधातुन चुलत भावाचा खुन

Next
पुणो :  चुलत भाउजयीसोबत गेल्या काही वर्षापासुन असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या तिच्या पतीचा म्हणजे चुलत भावाचा हिंगणो येथे राहणा-या भावानेच डोक्यात दगड घालुन आणि चाकुने वार करून 2क् नोव्हेंबरला खुन केला. त्याचा मृतदेह सिंहगड पोलिसांना सोमवारी रात्नी मिळाला असता त्यावरून अधिक तपास करून सिंहगड पोलिसांनी आरोपी निष्पन्न करत 24 तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला.  
ओमकार काशिनाथ नातेकर (वय 35, हिंगणो) असे खुन करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर त्याचा  खुन केल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी त्याचा चुलत भाउ अर्जुन बाबुराव नातेकर (वय 25, रा. हिंगणो) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओमकार व अर्जुन हे दोघे बांधकाम मजुर असून ओमकारची प}ी पदमा हिच्यासोबत अर्जुनचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध जुळले होते. याची माहीती मयत ओमकार याला होती व त्याचा यास विरोध होता. यावरून त्यांच्यामध्ये अनेकदा भांडणोही होत असत. मात्न अर्जुन आणि पदमा यांचे संबंध हे अधिकच दृढ होत गेले. यातुन त्यांनी ओमकार याचा खुन करण्याचा कट रचला.  (प्रतिनिधी)
 
4आरोपी अर्जुन याने 2क् नोव्हेंबरला (गुरूवारी) दुपारी ओमकारला वडगांव खुर्द येथील मुळा नदीच्या काठी सव्र्हे नंबर 47 येथे नेले. तेथे एका झाडाखाली दोघांनी दारू प्यायली. यावेळी अर्जुनने ओमकारला जास्त प्रमाणात दारू पाजली आणि त्याचा डोक्यात दगड घालुन आणि चाकुने वार करून खुन केला. यानंतर त्याने त्याचा मृतदेह तिथेच टाकुन दिला. हा मृतदेह कुजलेल्या स्वरूपामध्ये सोमवारी रात्नी सिंहगड पोलिसांना आढळुन आला असता पोलिसांनी तो मृतदेह ससूनमध्ये शवविच्छेदनासाठी दिला. यानंतर तपासाची चक्रे जोरदार फिरवत त्यांच्याविषयी माहिती घेउन या गुन्ह्याचा छडा लावला, अशी माहिती सिंहगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिवाजी राउत यांनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास राउत हे करत आहेत. 

 

Web Title: Cousin's murder of immorality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.