डबल म्युटंटर विषाणूवर कोवँक्सिन प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:26+5:302021-04-22T04:11:26+5:30

पुणे: कोरोनाचा भारतात आढळलेला विषाणू दुहेरी ऊत्परिवर्तीत (डबल म्युटंट) होत असल्यानेच त्याचा संसर्ग वेगाने होत आहे. त्याच्यावर कोवँक्सिन यशस्वी ...

Covacin effective on double mutant virus | डबल म्युटंटर विषाणूवर कोवँक्सिन प्रभावी

डबल म्युटंटर विषाणूवर कोवँक्सिन प्रभावी

Next

पुणे: कोरोनाचा भारतात आढळलेला विषाणू दुहेरी ऊत्परिवर्तीत (डबल म्युटंट) होत असल्यानेच त्याचा संसर्ग वेगाने होत आहे. त्याच्यावर कोवँक्सिन यशस्वी मात करत असल्याचे संशोधन राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत (एन आयव्ही) झाले आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी अधिक्रुतपणे हे संशोधन जाहीर केले आहे अशी माहिती नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडोमिऑलॉजी या चेन्नईतील संस्थेचे संस्थापक व माजी संचालक डॉ. मोहन गुप्ते यांनी दिली. ए

याविषयी सांगताना डॉ. गुप्ते म्हणाले, विषाणूंमध्ये ऊत्परिवर्तन (डबल म्युटंट) होतच असते. इग्लंड, ब्राझील, साऊथ आफ्रिका इथे असे ऊत्परिवर्तन झालेले विषाणू आढळले व ते भारतातही सापडले आहेत. मात्र भारतातील कोरोना विषाणूत दुहेरी ऊत्परिवर्तन होत असल्याचे निदर्शानस आले. त्यामुळेच त्याचा संसर्गाचा वेग बराच आहे. त्याला आळा घालण्याविषयी संशोधन सुरू होते. कोवँक्सिनमुळे हा प्रतिबंध होतो.

चाैकट

डबल म्युटंट म्हणजे काय?

डॉ. गुप्ते म्हणाले, शरीरात प्रवेश केलेल्या विषाणूचे दुहेरी ऊत्परिवर्तन होते. साहजिकच त्याचा शरीरातील परिणाम तर वाढतोच शिवाय त्याचा संसर्गही वेगाने होतो. कोवँक्सिन त्याच्या डबल म्युटंट होण्याला प्रतिबंध तर करतेच शिवाय त्याला निष्प्रभही करते असे संशोधनात दिसून आले आहे. यामुळे रूग्णाच्या शरीरातील त्या विषाणूची संख्या कमी होत जाते व तो नष्ट होतो. अशा व्यक्तींमध्ये प्रतीपिंड म्हणजे अँटिबॉडिजही वेगाने वाढतात. अशा व्यक्तींची संख्या वाढली तर कोरोनाच्या या विषाणूंचा संसर्गही वेगाने कमी होईल. हा याचा फायदा आहे.

Web Title: Covacin effective on double mutant virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.