पुणे शहरात सोमवारी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध; लसीकरणाची ऑनलाईन बुकींग सकाळी ८ पासून सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 08:17 PM2021-09-05T20:17:49+5:302021-09-05T20:17:58+5:30
महापालिकेच्या वतीने शिल्लक साठयातून प्रत्येकी १४० लसीचे डोस महापालिकेकडून वितरित करण्यात आले आहेत.
पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून नव्याने कोव्हिशिल्ड लस प्राप्त न झाल्यामुळे, सोमवारी शहरात कोव्हिशिल्ड लस मिळणार नाही. मात्र ससून रुग्णालयासह महापालिकेच्या झोननिहाय ११ दवाखान्यात, महापालिकेच्या वतीने शिल्लक साठयातून प्रत्येकी १४० लसीचे डोस महापालिकेकडून वितरित करण्यात आले आहेत.
लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर १५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर कोव्हॅक्सिन लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही २८ दिवस पूर्ण झालेल्यांना ( ९ ऑगस्ट पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगव्दारे तर ३५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.