खळद येथे २०० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:17+5:302021-04-22T04:09:17+5:30

ग्रामीण संस्थेच्या वतीने ५० ऑक्सिजनच्या बेड्स आणि १५० विलगीकरण बेड्सची उपलब्धता केली आहे. येथे तीन शिफ्टमध्ये ...

Covid Care Center of 200 beds started at Khalad | खळद येथे २०० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू

खळद येथे २०० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू

Next

ग्रामीण संस्थेच्या वतीने ५० ऑक्सिजनच्या बेड्स आणि १५० विलगीकरण बेड्सची उपलब्धता केली आहे. येथे तीन शिफ्टमध्ये ९ डॉक्टर व आरोग्यसेविका अशा एकूण ७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती शासन आणि ग्रामीण संस्थेकडून करण्यात आली असून औषोधोपचार, दोन वेळचे जेवण आणि नाश्त्याची सुविधा असून ग्रामीण संस्था कायम नागरिकांबरोबर असल्याचे आ. संजय जगताप व ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांनी सांगितले. कोविड सेंटरचे ग्रामीण संस्थेचे संचालक अनिल उरवणे, डॉ. सुमीत काकडे, मुन्ना शिंदे यांनी नियोजन करीत आहेत.

याप्रसंगी गटविकास अधिकारी अमर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक आबनावे, सासवड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उत्तम तपासे, डॉ. किरण राऊत, जि. प. सदस्य दत्ता झुरंगे, जेजुरीच्या नगराध्यक्षा विणा सोनवणे, डॉ. प्रवीण जगताप, प्रदेश काँग्रेसचे जेष्ठ नेते नंदकुमार जगताप, प्रदेश काँग्रेसचे महासचिव गणेश जगताप, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, पाणी पंचायतच्या डॉ. सोनाली शिंदे, खळदचे ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे, संतोष गिरमे, मयूर जाधव, विकास इंदलकर, तुषार ढुमे, विकी रणनवरे, बंडू राऊत आदी उपस्थित होते.

वीर, निरा येथे ही कोविड सेंटर शनिवारपासून सुरू : आ. संजय जगताप

दिवे, जेजुरी या ठिकाणी कोविड सेंटर सुरू आहेत, आज खळद येथे सेंटर सुरू केले आहे. येत्या शनिवारपासून खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीर येथे देवस्थानच्या वतीने, तसेच निरा येथेही कोविड केअर सेंटर सुरू होत असून, हवेलीतील उरुळी आणि आंबेगाव येथेही लवकरच कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात येणार असल्याचे आ. संजय जगताप यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी विशेषतः युवा वर्गाने शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

खळद (ता. पुरंदर) येथे ग्रामीण संस्थेच्या आनंदी कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी संजय जगताप, प्रमोद गायकवाड, राजवर्धिनी जगताप, अमर माने, डॉ. विवेक आबनावे व इतर मान्यवर.

Web Title: Covid Care Center of 200 beds started at Khalad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.