वानवडीतील रुबी हाॅलमध्ये कोविड केअर विभाग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:22+5:302021-04-19T04:10:22+5:30
वानवडी : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वानवडीतील रुबी हाॅल हाॅस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी ...
वानवडी : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वानवडीतील रुबी हाॅल हाॅस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी व्यवस्थापनाकडून ३० आॅक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वानवडीमध्ये कोविड केअर सेंटर असावे या हेतूने प्रभागातील नगरसेवक प्रशांत जगताप यांनी रुबी हाॅल हाॅस्पिटलच्या व्यवस्थापनाला विनंती केली होती. या विनंतीचा विचार करून तसेच वानवडीत कोविड केअर सेंटरची गरज लक्षात घेऊन आझादनगर येथील रुबी हाॅलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
१२ एप्रिलपासून 'कोविड विभाग' सुरू करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढती संख्या लक्षात घेता रुबी हॉस्पिटलने बेडची संख्या वाढवावी, अशी विनंती प्रशांत जगताप यांनी रुबी हाॅलच्या संचालकांना केली आहे.