सोमतवाडीत १०० बेडचे कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:26+5:302021-04-29T04:08:26+5:30

तालुक्यात लेण्याद्री (३५० बेड्स), ओझर (२१० बेड्स), शिरोली (२५ ऑक्सिजन बेड्स) तसेच नारायणगाव (२४ सर्व सोयीयुक्त बेड) येथे शासकीय ...

Covid center of 100 beds started in Somatwadi | सोमतवाडीत १०० बेडचे कोविड सेंटर सुरू

सोमतवाडीत १०० बेडचे कोविड सेंटर सुरू

Next

तालुक्यात लेण्याद्री (३५० बेड्स), ओझर (२१० बेड्स), शिरोली (२५ ऑक्सिजन बेड्स) तसेच नारायणगाव (२४ सर्व सोयीयुक्त बेड) येथे शासकीय कोविड केअर कार्यान्वित आहेत.

केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे ,पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसो देवाडे, नगरसेवक भाऊ कुंभार, केवाडीचे सरपंच अमोल लांडे, अजिंक्य घोलप, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, डॉ. शाम बनकर उपस्थित होते. या केंद्रावर विविध वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती झाली असून लवकरच वडज येथे देखील कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसो देवाडे यांनी आदीवासी भागात कोविड केअर सेंटर सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. केंद्रासाठी आमदार बेनके यांनी एक लाखाचा निधी दिला असून समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनीही मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

२८ जुन्नर

सोमतवाडी येथील कोविड सेंटरचे उद्घाटन प्रसंगी अतुल बेनके, देवराम लांडे, भाऊसो देवाडे, अमोल लांडे व इतर.

Web Title: Covid center of 100 beds started in Somatwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.