शिक्रापुरात २५ ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:35+5:302021-05-16T04:11:35+5:30
शिक्रापूर : शिक्रापूर व परिसरात वाढती कोरोना संख्या लक्षात घेत गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी असलेले शिक्रापूर आरोग्य ...
शिक्रापूर : शिक्रापूर व परिसरात वाढती कोरोना संख्या लक्षात घेत गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी असलेले शिक्रापूर आरोग्य केंद्रामध्ये २५ ॲाक्सिजन बेडचे कोरोना सेंटर सुरू करण्यात आले. सेंटरचे उद्घाटन शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या झाले.
सेंटरमधील यातील २० बेड कोरोनाबाधित रुग्णांसाठी तर पाच बेड संशयित रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत. शिक्रापूर परिसरातील नागरिकांना ॲाक्सिजन बेड मिळवण्यासाठी खासगी हॅास्पिटलला धाव घ्यावी लागत होती. बरेचदा ॲाक्सिजन मिळाला नाही म्हणून रूग्णांची गैरसोय होत होती, म्हणून शिक्रापूर सणसवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कुसूम मांढरे पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार व आमदार अशोक पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र शिक्रापूर येथे तत्काळ कोरोना रूग्णांना ॲाक्सिजन बेड सुरू करण्याच्या आरोग्य व महसूल विभागांना सूचना देवून येथे आज रूग्णांना सुविधा उपलब्ध करून दिली.
सण २०१० साली शिक्रापूर परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेवून त्यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी निर्णय घेऊन शिक्रापूर येथे ४.५ कोटी रूपयांचा शासनाकडून निधी मिळवून या आरोग्य केंद्राच्या इमारतीची उभारणी केली. गेली काही वर्षे सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी उपचार घेणे सहज सोपे झाले. आज याच इमारती मध्ये पुन्हा नव्याने ॲाक्सिजन बेड सुविधा उपलब्ध करून दिल्याने कोरोना रूग्णांना होणारा त्रास थांबवण्यात मदत होणार आहे. याप्रसंगी औंध हॅास्पिटलचे डॅा. नांदापूरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा. मोरे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सभापती मोनिका हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन मंडळांचे सदस्य पंडित दरेकर, सभापती राजेंद्र नरवडे, उपसभापती विकास शिवले, संचालक सुदीप गुंदेचा, उपसरपंच सुभाष खैरे, सदस्य मयूर करंजे पाटील, रमेश थोरात, रविंद्र पाटील, रमेश भुजबळ, तसेच आरोग्य केंद्र शिक्रापूर येथील डॅाक्टर, स्टाफ उपस्थित होते.
--
फोटो : १५शिक्रापूर सेंटर
ता. शिरूर येथील आरोग्य केंद्रात ऑक्सिजन बेडचे उद्घाटन करतांना जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, आमदार अशोक पवार व आरोग्य अधिकारी .(धनंजय गावडे)