ओझर येथे कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार: बेनके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:10 AM2021-03-31T04:10:46+5:302021-03-31T04:10:46+5:30

नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात तालुक्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि उपाययोजना याविषयी प्रशासकीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली ...

Covid Center to reopen at Ozark: Benke | ओझर येथे कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार: बेनके

ओझर येथे कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार: बेनके

Next

नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात तालुक्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि उपाययोजना याविषयी प्रशासकीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक आमदार बेनके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी प्रांताधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार हनुमंत कोळेकर, उपविभागीय पोलीस आधिकारी मंदार जवळे, सभापती विशाल तांबे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शाम बनकर, जि. प. सदस्य पांडुरंग पवार, मोहित ढमाले, जिल्हा नियोजन समिती सदस्य विकास दरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ आदी उपस्थित होते.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्यापारी, शेतकरी, नागरिकांनी काळजी घेणे आवशयक आहे, सर्वांची अँटिजेन टेस्ट करण्याचा, कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे या बैठकीत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व व्यापारी, बाजार समितीतील सर्व कर्मचारी, मापाडी, व्यापारी, कामगार, शेतकरी, भाजीपाला विक्रेते आदींची अँटिजेन टेस्ट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला. त्याचबरोबर तालुक्यातील आठवडे बाजार बंद करून दैनंदिन बाजार भरविणे, हॉटेल, ढाबे सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत चालू राहतील. लग्न समारंभाला प्रशासनाची परवानगी आवश्यक असेल, कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात ज्या भागात सापडतील तो भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात येणार आहे.

जुन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितांची वाढत असलेली रुग्णसंख्या व त्यावर उपाययोजना याविषयी नारायणगाव येथील प्रशासकीय आढावा बैठकीत विचार मांडताना आमदार अतुल बेनके यावेळी प्रांत सारंग कोडलकर, उपविभागीय पोलीस आधिकारी मंदार जवळे, सभापती विशाल तांबे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी व इतर अधिकारी.

Web Title: Covid Center to reopen at Ozark: Benke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.