रोटरी क्लबतर्फे कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:12 AM2021-05-09T04:12:31+5:302021-05-09T04:12:31+5:30
पाच हजार मास्कचे वाटप करणे. कोविड सेंटरला सहाशे खाटा देणे. लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे. लसीकरणासाठी निवारा बांधणे. पीपीई किटचे ...
पाच हजार मास्कचे वाटप करणे. कोविड सेंटरला सहाशे खाटा देणे. लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे. लसीकरणासाठी निवारा बांधणे. पीपीई किटचे वाटप करणे. त्याचा एक भाग म्हणून घोले रोड येथील जे. पी. त्रिवेदी ट्रस्टच्या वसतिगृहाच्या जागेत एकूण ४४ खोल्यांमध्ये ७० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या केंद्राला जे. पी. त्रिवेदी आणि रोटरीज श्वास कोविड सेंटर असे नाव देण्यात आले आहे. यासाठी सौरव राव, वंदना चव्हाण, डॉ. सतीश देसाई आदी सर्वांचा अतिशय मोठा मदतीचा हात मिळाला. या कामासाठी रोटरी क्लबनी ७० लाख रुपयांहून अधिकची मदत गोळा केली असून, हे सेंटर ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविण्यात येणार आहे. या वेळी रश्मी कुलकर्णी, आदित्य देवधर, पराग मुळे, सुदिन आपटे, जितू मेहता, गिरीश गुणे, सुबोध जोशी, अभय गाडगीळ, विनय कुलकर्णी आदींचे सहकार्य लाभले आहे.