पारगावमध्ये कोविड विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:51+5:302021-05-06T04:11:51+5:30
पारगाव येथील पारेश्वर विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कक्षाचे ऑनलाइन उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. विलगीकरण केंद्रामध्ये वीस ...
पारगाव येथील पारेश्वर विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कक्षाचे ऑनलाइन उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले.
विलगीकरण केंद्रामध्ये वीस बेडची सोय करण्यात आली आहे. तसेच नाष्टयाची देखील सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कोविड रुग्णांनी घरात राहून धोका पत्करू नये व विलगीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पारगावच्या सरपंच प्रियंका मेमाणे यांनी केले. या वेळी ऑनलाइनच्या माध्यमातून दिगंबर दुर्गाडे, सभापती नलिनी लोळे, गौरी कुंजीर, सुनीता कोलते, पी. एस. मेमाणे, संतोष कोलते, ग्रामपंचायत उपसरपंच महेश मेमाणे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मेमाणे, ज्योती भाऊसाहेब मेमाणे, शीतल गायकवाड, अर्चना मेमाणे, ज्योती मेमाणे, ग्रामसेवक कमल कुंजीर, तलाठी सतीश उमप आदी उपस्थित होते.