ज्येष्ठ ‘सीएं’साठी कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:58+5:302021-03-23T04:12:58+5:30

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) शाखेच्या वतीने ज्येष्ठ सनदी लेखापाल व त्यांचे जवळील नातेवाईक ...

Covid vaccination for seniors | ज्येष्ठ ‘सीएं’साठी कोविड लसीकरण

ज्येष्ठ ‘सीएं’साठी कोविड लसीकरण

Next

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) शाखेच्या वतीने ज्येष्ठ सनदी लेखापाल व त्यांचे जवळील नातेवाईक यांच्यासाठी कोविड-१९ लसीकरण शिबिर आयोजिले आहे. बिबवेवाडी, पुणे-सातारा रस्त्यावरील राव नर्सिंग होम येथे हे शिबिर होणार आहे. साठ वर्षांवरील, तसेच ४५ ते ६० या वयोगटातील सनदी लेखापालांना व त्यांच्या कुटुंबियांना याचा लाभ घेता येईल, अशी माहिती आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष सीए काशिनाथ पठारे यांनी दिली. लसीकरणासाठी https://selfregistration.cowin.gov.in/ या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर 'आयसीएआय पुणे'कडून लसीकरणाची तारीख आणि वेळ कळविण्यात येईल. नोंदणी व अन्य अधिक माहितीसाठी ‘आयसीएआय’ भवन येथे श्वेताली, सीए समीर लड्डा किंवा सीए काशिनाथ पठारे यांच्याशी सकाळी १० ते ५ यावेळेत संपर्क साधावा, असे संयोजकांनी कळविले आहे.

Web Title: Covid vaccination for seniors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.