कोविड वॉररूम हेल्पलाईन क्रमांक ‘एकच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:09 AM2021-04-19T04:09:46+5:302021-04-19T04:09:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेच्या कोविड वॉररूमव्दारे (टेलीफोनिक कॉल सेंटर) रूग्णालयातील बेड मिळविण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या, दहा ...

Covid Warroom Helpline Number 'Single' | कोविड वॉररूम हेल्पलाईन क्रमांक ‘एकच’

कोविड वॉररूम हेल्पलाईन क्रमांक ‘एकच’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे महापालिकेच्या कोविड वॉररूमव्दारे (टेलीफोनिक कॉल सेंटर) रूग्णालयातील बेड मिळविण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या, दहा टेलिफोन लाईनपैकी केवळ एकच क्रमांक चालू असल्याचे महापालिकेच्या आयटी व टेलिफोन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़ त्यामुळे आत्तापर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास महापालिकेच्या वॉररूममध्ये दहा संपर्क उपलब्ध करून देण्यात आल्याची पदाधिकाऱ्यांसह इतर विभागांनी दिलेली माहिती पूर्णत: चुकीची निघाली असून, ०२०-२५५०२११० हा क्रमांक वगळता इतर सर्व क्रमांक वारंवार व्यस्तच लागत आले आहेत़

दरम्यान, आजपर्यंत किंबहुना कोरोना आढावा बैठकीसाठी शुक्रवारी तयार करण्यात आलेल्या साप्ताहिक अहवालामध्येही महापालिकेने कोविड वॉररूम कॉल सेंटरचे पुन्हा पाच हेल्पलाईन क्रमांक जाहीर करून तीच चूक केली आहे़ प्रत्यक्षात मात्र ०२०-२५५०२११० हा क्रमांक वगळता इतर सर्व क्रमांक हे अंतर्गत म्हणजेच हंटिंग लाईन आहेत़

महापालिकेच्या आयटी विभागाने (माहिती व तंत्रज्ञान विभाग) दिलेल्या माहितीनुसार, कॉल सेंटरकरिता दूरध्वनी विभागामार्फत ०२०- २५५०२११० ही मुख्य हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे़ या लाईनवरती १० दूरध्वनी (हटिंग) लाईन्स मागणीनुसार त्वरित कार्यान्वित करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे ०२०- २५५०२११० या क्रमांकावर फोन आल्यास तो इतर दहा क्रमांकापैकी १० पैकी जी लाईन फ्री आहे त्यावर वर्ग होतो. परंतु, हेल्पलाईनचे १० ही नंबर जाहीर केले गेल्यामुळे, त्या त्या वैयक्तिक नंबरवर फोन केल्यास ते फोन क्रमांक वारंवार व्यस्तच लागत आले आहेत़

---------------------------------

Web Title: Covid Warroom Helpline Number 'Single'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.