Corona Vaccination In Pune: शुक्रवारी १८७ केंद्रांवर कोव्हिशिल्ड, तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सिन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 07:51 PM2021-10-07T19:51:17+5:302021-10-07T19:51:25+5:30
लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार
पुणे : पुणे महापालिकेच्या १८७ केंद्रांवर शुक्रवारी ८ तारखेला प्रत्येकी १५० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे, तर ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी १५० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उपलब्ध लसींच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १० टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर १० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे, तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (१५ जुलैपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर ४० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे.
तर कोव्हॅक्सिन लसीचा ११ सप्टेंबरपूर्वी पहिला डोस घेतला आहे. त्यांना दुसरा डोस मिळणार असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.