१०३ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस आज उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:55+5:302021-05-28T04:09:55+5:30

पुणे : शहरात गुरुवारी महापालिकेच्या १०३ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, या सर्व ...

Covishield vaccine is available today at 103 centers and Covacin vaccine at 15 centers | १०३ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस आज उपलब्ध

१०३ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस आज उपलब्ध

googlenewsNext

पुणे : शहरात गुरुवारी महापालिकेच्या १०३ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत़ ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्यासाठी आज (शुक्रवारी) सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार: उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी ६० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग करून अपॉईन्मेंट घेतलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़ तर, २० टक्के लस ही ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लसीकरण केंद्रावर ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़

तसेच, २० टक्के लस ही ४५ वर्षांवरील नागरिकांना की ज्यांनी ८४ दिवसांपूर्वी ( दि. ४ मार्च पूर्वी) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस म्हणून देण्यात येणार आहे़

तर लसीकरण केंद्रावर शिल्लक राहिलेले डोस हे दिव्यांग नागरिक, स्तनदा माता, फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ वर्कर व त्यानंतर उपस्थित असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस म्हणून देण्यात येईल.

------------------

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध

ज्या नागरिकांनी ३० एप्रिलपूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़

------------------------

Web Title: Covishield vaccine is available today at 103 centers and Covacin vaccine at 15 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.