आज १२१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:43+5:302021-07-02T04:09:43+5:30
पुणे : शहरातील महापालिकेच्या १२१ केंद्रांवर आज (शुक्रवार, दि. २ जुलै) कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे़ तर, महापालिकेच्या ...
पुणे : शहरातील महापालिकेच्या १२१ केंद्रांवर आज (शुक्रवार, दि. २ जुलै) कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे़ तर, महापालिकेच्या ६० दवाखान्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील वर्गाला लस उपलब्ध असणार आहे़ यात ७० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर ३० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळणार आहे़
याचबरोबर ससून रुग्णालयासह महापालिकेच्या ६ दवाखान्यांमध्ये कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस ज्यांनी ३ जून पूर्वी पहिला डोस घेतला आहे, अशांना ५० टक्के लस ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर ५० टक्के लस ही ऑन दी स्पॉट उपलब्ध असेल़ कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस मात्र उपलब्ध राहणार नाही़
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. याव्दारे ९ एप्रिलपूर्वी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना ३० टक्के लस दुसरा डोस ऑनलाईन बुकिंगव्दारे घेता येणार आहे़ तर ३० टक्के लस ही हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्षेवयावरील नागरिकांना ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळणार आहे़
----
पोलीस, रेल्वे रुग्णालयांमध्येही लसीकरण
महापालिकेने १८ ते ४४ वयोगटातील वर्गासह ४५ वयोगटापुढील वर्गाला पुणे महापालिका हद्दीतील विविध सरकारी रुग्णालयांमध्येही लस उपलब्ध करून दिली आहे़ यात उपलब्ध लससाठ्यापैकी ५० टक्के लस ही १८ ते ४४ वयोगटाला व ५० टक्के लस ही ४५ वयोगटापुढील वर्गाला दिली जाणार आहे़ ऑन दी स्पॉट नोंदणी करून ही लस उपलब्ध होणार आहे़ पोलीस हॉस्पिटल, स्वारगेट, डी़ आर.डी़ ओ़ बावधान, येरवडा कारागृह, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, ससून रुग्णालय, रेल्वे हॉस्पिटल पुणे स्टेशन, एस़ आर.पी़ एफ. वानवडी, पोलीस हॉस्पिटल शिवाजीनगर, एनडीए खडकवासला व आय़आय़एसईआर औंध-पाषाण येथे ही लस उपलब्ध असणार आहे़
-------------------