आज १८१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:05+5:302021-06-30T04:09:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील महापालिकेच्या १८१ केंद्रांवर आज (बुधवार, दि. ३० जून) कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील महापालिकेच्या १८१ केंद्रांवर आज (बुधवार, दि. ३० जून) कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे़ यापैकी महापालिकेच्या ६१ दवाखान्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील वर्गाला लस उपलब्ध असणार आहे़ यात ७० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर ३० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळणार आहे़
दरम्यान, आजपासून कोव्हॅक्सिन लसीचे लसीकरण केंद्र महापालिकेने १६ वरून प्रत्येक झोननिहाय कमी केले असून, ही संख्या आता ससून रुग्णालयासह ६ वर आली आहे़ कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने हा निर्णय महापालिकेने घेतला आहे़ ज्या नागरिकांनी ज्यांनी १ जूनपूर्वी पहिला डोस घेतला आहे, अशांना ५० टक्के लस ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर ५० टक्के लस ही ऑन दी स्पॉट उपलब्ध असेल़
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार: लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. याव्दारे ७ एप्रिलपूर्वी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना ३० टक्के लस दुसरा डोस ऑनलाईन बुकिंगव्दारे घेता येणार आहे़ तर ३० टक्के लस ही हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ४५ वर्षेवयावरील नागरिकांना ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळणार आहे़
तसेच, २० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग केलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस म्हणून व उर्वरित २० टक्के लस ही हेल्थ केअर वर्कर, फ्रं ट लाईन वर्कर व ४५ वर्षेवयावरील नागरिकांना पहिला डोस म्हणून सर्व केंद्रांवर दिली जाणार आहे़ तसेच सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास ऑन द स्पॉट नोंदणी करून लस नागरिकांना देण्यात यावी अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आले असल्याचेही महापालिकेने कळविले आहे़
----