आज १८६ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:12 AM2021-07-29T04:12:24+5:302021-07-29T04:12:24+5:30

पुणे : शहरातील महापालिकेच्या १८६ केंद्रांवर आज (गुरुवार दि. २९ जुलै) कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे़ लसीच्या उपलब्ध ...

Covishield vaccine available today at 186 centers | आज १८६ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

आज १८६ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध

Next

पुणे : शहरातील महापालिकेच्या १८६ केंद्रांवर आज (गुरुवार दि. २९ जुलै) कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे़ लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना २० टक्के लस ही आॅनलाईन बुकिंगद्वारे, तर २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे़

कोव्हिशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (५ मे पूर्वी लस घेतलेल्यांना) आॅनलाईन बुकिंगद्वारे तर ३० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे़

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता आॅनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. तसेच सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास आॅन स्पॉट नोंदणी करून उपलब्ध लस नागरिकांना देण्यात यावी अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या आहेत़

--------------------

सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस

शहरातील ससून हॉस्पिटलसह महापालिकेच्या प्रत्येक झोननिहाय पाच ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार असून, आॅनलाईन बुकिंगव्दारे २० टक्के लस ही १८ वर्षांपुढील नागरिकांना व २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी केलेल्यांना पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़

Web Title: Covishield vaccine available today at 186 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.