आज १८६ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:14 AM2021-09-15T04:14:58+5:302021-09-15T04:14:58+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या १८६ लसीकरण केंद्रांवर (बुधवार दि.१५) प्रत्येकी २२५ कोविशिल्ड लसीचे डोस वितरित करण्यात आले आहेत. मात्र, ...
पुणे : पुणे महापालिकेच्या १८६ लसीकरण केंद्रांवर (बुधवार दि.१५) प्रत्येकी २२५ कोविशिल्ड लसीचे डोस वितरित करण्यात आले आहेत. मात्र, बुधवारी कोव्हॅक्सिन लस कुठेही उपलब्ध राहणार नाही.
लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर १५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे, तर कोविशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (२३ जूनपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर ३५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.
--------------------