गायीलाच दुधाने घातली अंघोळ, सर्वपक्षीय आंदोलनात उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:46 AM2018-07-19T01:46:53+5:302018-07-19T01:46:56+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले आहेत.
भवानीनगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले आहेत. तालुक्यातील जाचकवस्ती येथे गायीलाच दुधाने आंघोळ घालुन सर्वपक्षीय कार्यकत्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे.शेतकऱ्यांना प्रतिलिटर सुमारे १० रुपये तोटा दूध धंद्यामध्ये सहन करावा लागत आहे. मात्र, याबाबत कोणी गंभीर नाही. वाढत्या तोट्यामुळे शेतकरी अडचणीत चालला आहे, असे मत यावेळी जाचकवस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर यांनी मांडले. शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलीटर ५ रुपये अनुदान जमा करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेण्याचा इशारा यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी संग्रामसिंह निंबाळकर, प्रकाश नेवसे, राहुल जगताप, सिद्धार्थ जाचक, अमरसिंह निंबाळकर, अमोल भोईटे आदींनी सहभाग घेतला.
>बोबडेमळा येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन
सुपे : पानसरेवाडी (ता. बारामती) अंतर्गत असणाºया बोबडेमळा येथील शेतकºयांनी दूधदरवाढीसाठी तीव्र आंदोलन केले. राज्यशासनाने दुधाचे दर त्वरित वाढवावे, यासाठी बोबडेमळा येथील शेतकºयांनी आक्रमक होऊन दूध खाली ओतून दिले.
येथील शेतकरी मागील दोन दिवसांपासून दूध आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. येथील शेतकºयांना पावसाअभावी जनावरांचा चारा विकत घ्यावा लागत आहे. चाºयाचा सध्या बाजारभाव २ हजार ५०० रुपये
प्रतिटन आहे.
जनावरांच्या संगोपनासह सर्व हिशोब केला तर दररोज चार जनावरांच्या मागे ४०० रुपये तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती तात्यासाहेब काळखैरे, लव्हाजी काळखैरे, नवनाथ काळखैरे, संतोष काळखैरे यांनी दिली. सरकारने आता तरी शेतकºयांचा अंत पाहू नये. दुधाला प्रतिलिटर २७ रुपये बाजारभाव द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
>भिलारवाडीत शेतकºयांची दुधाने अंघोळ
काºहाटी : भिलारवाडी येथे दुधाने अंघोळ करीत शेतकºयांनी दूधदरवाढ आंदोलनाला पाठिंबा दिला. शेतकºयाच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणीला समर्थन म्हणून भिलारवाडी परिसरामध्ये दूध संकलन न करण्याचा निर्णय घेऊन आंदोलन करण्यात आले. बारामती तालुक्यातील भिलारवाडी जळगाव कडेपठार परिसरामध्ये शेतकºयांनी दूध संकलन केंद्रावर दूध न घालण्याचा निर्णय घेऊन आंदोलन सक्रिय केले आहे. जोपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर अनुदान मिळत नाही तोपर्यंत दूध घालणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे केंद्रावर संकलन झाले नाही. जिवापाड सांभाळलेली जनावरे शेतकºयांना जगवावी लागत आहेत. पाऊस नाही, पाणी नाही, जनावरांना चारा नाही आणि त्यातच दुधाला बाजारभाव नाही. जगायचं तर कसं जगायचं, आता नाही मग कधीच नाही, म्हणून आम्ही सगळे जण एकत्र येऊन दूध न घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे भिलारवाडीचे शेतकरी सुनील भिलारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.