कोझी अन् ब्लॅक पबमुळे रोजचा रस्त्यावर होतोय धांगडधिंगा; पहाटे तीन-साडेतीनपर्यंत चालतात पब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 02:54 PM2024-05-21T14:54:55+5:302024-05-21T14:55:06+5:30

अनेक वेळा या पबमध्ये अगदी शाळकरी मुले - मुलीसुद्दा येत जात असल्याचे नागरिकांनी सांगितले

Cozy and black pubs are the everyday street hustle and bustle Pubs open till 3-3:30 in the morning | कोझी अन् ब्लॅक पबमुळे रोजचा रस्त्यावर होतोय धांगडधिंगा; पहाटे तीन-साडेतीनपर्यंत चालतात पब

कोझी अन् ब्लॅक पबमुळे रोजचा रस्त्यावर होतोय धांगडधिंगा; पहाटे तीन-साडेतीनपर्यंत चालतात पब

चंदननगर : कोरेगाव पार्क येथील कोजी पब आणि मेरियेट येथील ब्लॅक पब यांच्यामुळे कोरेगाव अन् पुण्याच्या संस्कृतीचा अक्षरश: ऱ्हास केला आहे. दररोज रात्री दोन-तीन वाजेपर्यंत, तर शनिवारी पहाटे साडेतीन, तर कधी चार वाजेपर्यंत पबमध्ये धांगडधिंगा चालत असतो. त्याचा आवाज इतका मोठा असतो की शेजारी राहणाऱ्यांची झोप उडते. रात्री बारा-साडेबारापासून ते पहाटे तीनपर्यंत या पबमधून बाहेर पडणारी मद्यधुंद यांचा रस्त्यावर बेधुंद अवस्थेत धिंगाणा सुरू असतो. पब रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे.

शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले अश्विनी कोस्टा आणि अनिस अवधिया हे दोघे कल्याणीनगर येथे बॉलर या पबमध्ये गेले होते. हा पब सुमारे सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाला आहे. या पबलादेखील रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे, मात्र तरीदेखील सुरू झाल्यापासूनच हा पब रात्री दोनच्या पुढेच बंद होतो. विशेषत: शनिवारी रात्री तीन-तीन वाजेपर्यंत पब सुरू राहतो. त्यामुळे पब सुरू झाल्यापासून परिसरातील नागरिकांकडून या पबच्या विरोधत अनेक तक्रारी सुरू आहेत. कल्याणीनगरच्या परिसरामध्ये प्रल्हाद भुतडा यांच्या मालकीचा कोजी हा पब आहे. याच पबमध्ये अपघातग्रस्त पोर्सेचा या आलिशान कारचा चालक आला होता. येथील व्यवस्थापक सचिन काटकर यांनी पबमध्ये प्रवेश देताना मुले अल्पवयीन आहेत की नाही याची तपासणी केलीच नाही. यापूर्वीही ते कधीच करीत नाहीत. सॅटरडे नाईटच्या निमित्ताने सोशल मीडियावर विविध जाहिराती करायच्या, ऑफर्स द्यायच्या आणि हवे तितेके कस्टमर्स पबमध्ये घ्यायचे असा उद्योग राजरोस सुरू असतो. अनेक वेळा तर अगदी शाळकरी मुले-मुलीसुद्दा या पबमध्ये येत जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, पबकडून त्यांच्यावर ना बंदी घातली जात नाही. केवळ पैसे भरा, हातावर त्यांनी दिलेल्या बॅण्ड बांधा आणि रात्रभर नाचा, दारू प्या, हुक्का घ्या असा प्रकार सुरू असतो. रात्री एकपर्यंत साधारण तो या पबमध्ये होता तेथून तो काही मित्रांसोबर पुन्हा कोरेगाव पार्क हद्दीतील संदीप सांगळे यांच्या मालकीच्या ब्लॅक या पबमध्ये पोहोचला. तेथील बार व्यवस्थापक जयेश बोनकर यानेही त्याच्या वयाची विचारणा केली नाही. नेहमीच करत नाही. या पबमध्येही कायम अल्पवयीन मुलांचा धिंगाणा सुरूच असतो, अशी माहिती पबच्या शेजारील रहिवासी आणि रिक्षाचालकांनीही सांगितले. या घटनेतील त्याने भरपूर दारू प्याली व याच पबमधून तो रात्री तीन-सव्वातीनच्या सुमारास बाहेर पडला. या पबची हालतदेखील यापेक्षा या दोन्ही पबलादेखील रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे. मात्र, तरीदेखील याबाबत हे पब कधीच दीड वाजता बंद होत नाहीत. उलट दीडनंतर येथील धिंगाणा आणखी वाढतो. त्यामुळे या दोन्ही पबमध्येही अनेकदा नागरिकांनी तक्रार केली. पोलिसांमध्येही पबच्या त्रासाबद्दल निवेदन दिले होते. मात्र, पोलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे या पबवर ठोस अशी कारवाई कधीच झाली नाही.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली होती कारवाई

कल्याणी नगर परिसरात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवीत केलेल्या अपघातात दोघांचा बळी गेला. त्यापूर्वी अल्पवयीन मुलाने ब्लॅक इन मेरिएट सुट्स आणि कोझी रेस्टॉरंटमध्ये पार्टी केली होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ब्लॅक पब बारवर कारवाई केली आहे. हॉटेल मेरिएट सुट्सच्या ब्लॅक नावाच्या पबमध्ये अल्पवयीन मुलांना दारू विकली जात असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पंचशील इन्फ्रास्टक्चरचे मालक सागर चोरडिया आणि कोझी बारचे मालक प्रल्हाद भुतडा यांच्याविरुद्द न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. राज्य उत्पादन विभागाने १७ ते १९ मे या कालावधीत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. त्यामध्ये अल्पवयीन मुलांना दारू दिल्याचे त्यामध्ये दिसले होते. बारमध्ये कोण येतात याबाबतच्या नोंदीही येथे नसल्याचे आढळले. विभागाच्या नियमानुसार रजिस्टर ठेवणे आवश्यक होते. ते नसल्यामुळे चोरडियांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.

Web Title: Cozy and black pubs are the everyday street hustle and bustle Pubs open till 3-3:30 in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.