कचऱ्याने नागरिक हैराण
By admin | Published: May 9, 2017 03:25 AM2017-05-09T03:25:35+5:302017-05-09T03:25:35+5:30
येथील परिसरातील घनकचरा व घरगुती कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उरवडे : येथील परिसरातील घनकचरा व घरगुती कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
घोटावडे फाटा येथून उरवडे रस्त्याला जाताना कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतो. येता-जाता नागरिकांकडून हॉटेलमधील तसेच घरगुती घाण आणि खरकटे, काही प्रमाणात घनकचरा इथे टाकला जातो. कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने कचरा मोकाट जनावरे व कुत्र्यांमुळे पसरत आहे. या कचऱ्यातून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. यातून रोगराई वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. जवळच लहान मुलांची शाळा, आयटीआय केंद्र, महाविद्यालय असून विद्यार्थ्यांना नाका-तोंडावर रुमाल घेऊनच ये-जा करावी लागत आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियान सुरू असताना इकडे कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत.