कादवे खिंडीवरील रस्त्यात दरड हटवली; वेल्हे पानशेत रस्ता पुन्हा सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 16:46 IST2024-08-13T16:44:39+5:302024-08-13T16:46:40+5:30
रस्त्यावर नेहमीच वर्दळ असून दरड कोसळल्याने हा रस्ता बंद होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती

कादवे खिंडीवरील रस्त्यात दरड हटवली; वेल्हे पानशेत रस्ता पुन्हा सुरु
वेल्हे : वेल्हे ते पानशेत रस्त्यावर असलेल्या कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळुन वेल्हे ते पानशेत रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत पडलेली दरड हटवली व पुन्हा हा रस्ता सुरू झाला आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
राजगड तालुक्यातील वेल्हे ते पानशेत त जोडणारा रस्ता असून या रस्त्यावर कादवे खिंडीच्या जवळ पावसामुळे दरड कोसळले असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. राजगड तालुक्याचा भौगोलिक दृष्ट्या दोन विभाग पडतात पानशेत व वेल्हे असे दोन विभाग असून शासकीय कामासाठी पानशेत परिसरातील रुळे कादवे कुरण, घोल, दापसरे, आंबेगाव, शिरकोली, निगडे मोसे, आधी गावातील ग्रामस्थ वेल्हे या ठिकाणी येत असतात तालुक्यातील सर्व शासकीय मुख्य कार्यालय वेल्हे या ठिकाणी येत असल्याने शासकीय कामांसाठी पानशेत परिसरातील लोकांना या रस्त्यावरून जावे लागते. तसेच पुण्यापासून जवळ अंतर असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. याबाबत तहसीलदार निवास ढाणे म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करत जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील दरड हटवली व रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.