पुण्यात तब्बल २५ लाखांचं सोनं घेऊन कारागीर फरार; कारखान्यात दीड वर्षापासून होता कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 07:49 PM2021-08-25T19:49:10+5:302021-08-25T19:49:29+5:30

गेल्या महिन्यात ५७८ ग्रॅम सोन्याच्या लगडी दागिने बनविण्यासाठी दिल्या होत्या

Craftsman absconding in Pune with gold worth Rs 25 lakh; Was working in the factory for a year and a half | पुण्यात तब्बल २५ लाखांचं सोनं घेऊन कारागीर फरार; कारखान्यात दीड वर्षापासून होता कार्यरत

पुण्यात तब्बल २५ लाखांचं सोनं घेऊन कारागीर फरार; कारखान्यात दीड वर्षापासून होता कार्यरत

googlenewsNext
ठळक मुद्देकारागीर अर्धवट बनविलेले दागिने व सोन्याच्या लगडी घेऊन गेला पळून

पुणे : कारखान्यावर काम करणाऱ्या कारागीराला दागिने बनवण्यासाठी सोने दिले असता तब्बल २५ लाख ५५ हजार रुपयांची सोन्याची लगड घेऊन कारागीर फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सचिनंदन धरणी पाल (वय ५६, रा. रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पलास बादलजाना (वय २७, रा. गोपीनाथपूर, पूर्व मिदनापूर, प. बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाल यांचे रविवार पेठेतील पालगोल्ड स्मिथ या नावाने सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. त्यांच्याकडे पालस बादलजाना हा कारागीर गेल्या दीड वर्षापासून कामाला होता. तो त्यांच्याकडेच राहात होता. पाल यांच्याकडे शहरातील एका नामांकित सराफ पेढीतून दागिने बनविण्याचा ऑर्डर आली होती.

गेल्या महिन्यात २८ ऑगस्ट रोजी त्यांना २५ लाख ५५ हजार ६२६ रुपये किंमतीची ५७८ ग्रॅम सोन्याच्या लगडी दागिने बनविण्यासाठी दिल्या होत्या. त्याचे त्याने काही दागिने अर्धवट बनविले होते. त्यानंतर तो हे अर्धवट बनविलेले दागिने व सोन्याच्या लगडी घेऊन पळून गेला. काही दिवस वाट पाहिल्यानंतर आता पाल यांनी फिर्याद दिली असून फरासखाना पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Craftsman absconding in Pune with gold worth Rs 25 lakh; Was working in the factory for a year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.