घोरपडी लोहमार्गालगत लष्करी जवानाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 04:42 AM2018-07-30T04:42:40+5:302018-07-30T04:42:51+5:30

घोरपडीतील लोहमार्गालगत एका लष्करी जवानाचा मृतदेह रविवारी दुपारी आढळून आला. मुंढवा येथील सिग्नल ग्रुप हेडक्वार्टरमधील जवान रमेश (वय २८, रा़ घोरपडी, मूळ गाव वेल्लोर, तमिळनाडू) असे त्यांचे नाव आहे. ते २७ जुलैपासून बेपत्ता होते.

 Crashing iron lynchman's suicide | घोरपडी लोहमार्गालगत लष्करी जवानाची आत्महत्या

घोरपडी लोहमार्गालगत लष्करी जवानाची आत्महत्या

Next

पुणे : घोरपडीतील लोहमार्गालगत एका लष्करी जवानाचा मृतदेह रविवारी दुपारी आढळून आला. मुंढवा येथील सिग्नल ग्रुप हेडक्वार्टरमधील जवान रमेश (वय २८, रा़ घोरपडी, मूळ गाव वेल्लोर, तमिळनाडू) असे त्यांचे नाव आहे़ ते २७ जुलैपासून बेपत्ता होते़ याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार देण्यात आली होती़ आत्महत्या करण्यापूर्वी जवानाने कुटुंबीयांना लिहिलेली चिठ्ठी घटनास्थळी सापडली असून, आत्महत्येला कोणालाही दोषी धरू नये, असे त्यात म्हटले आहे़
घोरपडी लोहमार्गालगत रविवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. रेल्वेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी पाहणी केल्यानंतर तेथे कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्या वेळी तेथे एका लष्करी जवानाचा मृतदेह असल्याचे आढळून आले. ओळखपत्रावरून रमेश यांची ओळख पटविण्यात आली़ या प्रकरणाची तातडीने लष्कराला माहिती देण्यात आली. त्यानंतर तेथे लष्करी जवान मोठ्या संख्येने दाखल झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह हलविण्यात आला़ आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही़
लष्करी जवान रमेश अविवाहित होते. त्यांना दोन बहिणी आणि भाऊ आहे. त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले आहे. मृत्यूनंतर पैसे छोटी बहीण, तसेच भावाला देण्यात यावेत. मी आईवडिलांकडे चाललो आहे.
तुम्ही शिक्षण घ्या, स्वत:ची काळजी घ्या. माझ्या मृत्यूला कोणालाही
दोषी धरू नये, असे रमेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

Web Title:  Crashing iron lynchman's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे