जीव होतोय कासावीस

By admin | Published: June 1, 2016 12:49 AM2016-06-01T00:49:50+5:302016-06-01T00:49:50+5:30

शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करू लागली आहे. शिरूर तालुक्याच्या या भागातील डोंगरमाथ्यावरील गावे व वाड्यावस्त्यांवरील पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे

Creating life | जीव होतोय कासावीस

जीव होतोय कासावीस

Next

कान्हूर मेसाई : शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करू लागली आहे. शिरूर तालुक्याच्या या भागातील डोंगरमाथ्यावरील गावे व वाड्यावस्त्यांवरील पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे. माणसाबरोबर पशुपक्ष्यांचाही जीव घोेटभर पाण्यासाठी कासावीस होत आहे.
या भागातील पारंपरिक पाणवठे, बोर, विहिरी आटल्याने माणसांरोबरच जनावरांचे पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. विहिरी खोल गेल्याने पाणी कसेबसे काढून तहान भागविली जात आहे. बायाबावडे यांचा दिवसाचा वेळ केवळ पाणी मिळविणे याच कामासाठी जात आहे. नंबर लावून पाणी भरण्यासाठी रात्रही बोरवर काढावी लागत आहे. पाण्यासाठी रात्र जागून निघत असल्याने या परिसरातील दिवसाची मजुरी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे.
या भागात जेमतेम शिल्लक असणारे पाणीही दूषित झाले आहे. या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांमुळे आजारी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मिळणारे पाणीही गढूळ व दूषित असले, तरी नाइलाजास्तव गाळून ते पिण्यासाठी वापरावे लागत आहे.(वार्ताहर)

Web Title: Creating life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.