शहर गुन्हे शाखेत सहाव्या युनिटची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:12 AM2021-03-31T04:12:45+5:302021-03-31T04:12:45+5:30
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयात लोणीकंद व लोणी काळभोर या दोन पोलीस ठाण्यांचा समावेश केल्याने आयुक्तालयाची हद्द वाढली आहे. ...
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयात लोणीकंद व लोणी काळभोर या दोन पोलीस ठाण्यांचा समावेश केल्याने आयुक्तालयाची हद्द वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हे अन्वेषण शाखेत सहावे युनिट तयार केले आहे.
या दोन पोलीस ठाण्यांबरोबरच लवकर बाणेर, खराडी, फुरसुंगी, काळेपडळ, नांदेडसिटी अशी पाच नवी पोलीस ठाणी सुरू होणार आहे. त्यामुळे गुन्हे शाखेत नवीन युनिट तयार केले आहे. दोन वर्षांपूर्वी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय नव्याने सुरू केले. त्या वेळी पुण्यात ४ युनिट होती. त्यांची पुर्नरचना करताना पाच युनिट केली.
या नवीन युनिटची जबाबदारी पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्याकडे दिली आहे. युनिट ३ चे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांची लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बदली केली. त्यांच्या जागी चतु:श्रृंगीचे अनिल शेवाळे यांनी नियुक्ती केली आहे. युनिट एकचे पोलीस निरीक्षक सुनील ताकवले ३१ मार्च रोजी निवृत्त होत आहे. त्यांच्या जागी तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी नेमणूक केली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी आदेश काढले आहेत.