पुण्यात क्रिकेटवर बेटिंग घेणारे मास्टर माइंड अटकेत; परदेशातील बुकींशी संबंध

By विवेक भुसे | Published: September 27, 2022 02:20 PM2022-09-27T14:20:09+5:302022-09-27T14:26:20+5:30

२ टक्के कमीशन घेणाऱ्या दोघा मास्टर माइंड बुकींना सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे...

Cricket betting mastermind arrested in Pune; Relationship with overseas bookies | पुण्यात क्रिकेटवर बेटिंग घेणारे मास्टर माइंड अटकेत; परदेशातील बुकींशी संबंध

पुण्यात क्रिकेटवर बेटिंग घेणारे मास्टर माइंड अटकेत; परदेशातील बुकींशी संबंध

Next

पुणे : वेगवेगळ्या अ‍ॅप क्रिकेट बेटिंगकरीता ब्रोकरला व क्लायंटला बेकायदेशीरपणे लॉगीन आयडी पासवर्ड देऊन त्याबदल्यात १२ टक्के कमीशन घेणाऱ्या दोघा मास्टर माइंड बुकींना सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे.

आशय अवनिश शहा (वय २८, रा. सुजय गार्डन, सोसायटी, स्वारगेट) आणि हर्ष शैलेश पारेख (वय २२, रा. सिटीवुड सोसायटी, सॅलेसबरी पार्क, मार्केटयार्ड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भारतातील क्रिकेटवर होणाऱ्या बेटिंगमधील हे प्रमुख मास्टर माइंड असून सुपर मास्टर आणि मास्टर म्हणून ते या धंद्यात ओळखले जातात. ते परदेशस्थ क्रिकेट बुकींशी संपर्कात असून या कामासाठी बऱ्याच वेळा दुबईसारख्या ठिकाणी जात असतात. त्यांनी परदेशात कागदोपत्री कंपन्या स्थापन केलेल्या आहेत.

सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक सिटीवूड सोसायटीत गेले. तेथे हर्ष पारेख याच्या घरी अवनिश शहा हा बसलेला होता. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर शहा याने त्याचा मोबाईल बिघडला असल्यामुळे दुरुस्तीसाठी दिला आहे. तो सध्या हर्ष याच्या मोबाईलवरुन ब्रोकरला व क्लायंटला क्रिकेट बेटिंगसाठी लोटस बुक, वल्ड ७७७, डायमंड एक्सचेंज या ऍपद्वारे लॉगीन आय डी व पासवर्ड देत असल्याचे सांगिगतले. क्रिकेटच्या बेटिंगमध्ये आयश हा सुपर मास्टर व हर्ष हा मास्टर असून त्याबदल्यात क्रिकेट सामन्याच्या हार जीतवर त्यांना १२ टक्के रक्कम मोबदला मिळतो.

हर्ष पारेख याच्याकडे मिळालेल्या दोन्ही मोबाईलमध्ये लोटस बुक, वर्ल्ड ७७७, वुल्फ ७७७, डायमंड एक्सचेंज हे  ऑनलाईन क्रिकेट बेटिंग अ‍ॅप्लीकेशन आहेत. त्याचे मोबाईलमधील वॉटसअप चॅटिंग पाहिले असता त्यामध्ये टॅली व रॅपीड इकविरा नावाचे वॉटसअ? ऍप ग्रुपमध्ये ब्रोकरला व क्लायंटला क्रिकेट बेटिंगसाठी बेकायदेशीरपणे लॉगीन आय डी व पासवर्ड दिले असल्याचे दिसून आले. तसेच २३ सप्टेंबर रोजी झालेल्या इंग्लड व पाकिस्तान आंतरराष्ट्रीय  टी-२० सामन्यावरील क्रिकेट बेटिंगचे संदर्भात चॅटिंग व हार जीतच्या हिशोबाची आकडेवारी असल्याचे दिसून आले. या ग्रुपमध्ये बरेच मोबाईल नंबर हे परदेशातील असल्याचे आढळून आले. 

ही कामगिरी सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आश्विनी पाटील, उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे, मनिषा पुकाळे यांच्या पथकाने केली आहे़.

Web Title: Cricket betting mastermind arrested in Pune; Relationship with overseas bookies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.