किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन संघटनेच्या १३ पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:16 AM2021-08-13T04:16:07+5:302021-08-13T04:16:07+5:30
पुणे : कामगारांसाठी राबविलेल्या ग्रुप कर्ज योजनेत फसवणूक केल्याप्रकरणी किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन या संघटनेच्या १३ पदाधिका-यांविरुद्ध कोथरूड ...
पुणे : कामगारांसाठी राबविलेल्या ग्रुप कर्ज योजनेत फसवणूक केल्याप्रकरणी किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन या संघटनेच्या १३ पदाधिका-यांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी, प्रमोद पाटे (वय ४८, रा. सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २००८ ते ७ ऑगस्ट २०१४ या कालावधीत घडली आहे.
पाटे हे कमिन्स इंडिया कंपनीत नोकरीस असून, त्यांचे कंपनीमध्ये किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन ही संघटना आहे. येथील एका बँकेच्या सहकार्याने ग्रुप लोन स्कीम चालू असून, कामगाराने घेतलेल्या कर्जाचे हप्ते चुकविल्यास त्या कामगाराच्या वेतनातून रक्कम काढून बँकेला देणार, अशी लिखीत हमी कंपनीने बँकेला दिली होती. तसेच कामगारांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण वसुलीची जबाबदारी युनियनने घेतली असताना कर्जदार व अजित चंद्रकांत शेलार यांनी बँकेकडून २ लाख रुपये ग्रुप लोन स्कीम अंतर्गत कर्ज घेतले. त्यास फिर्यादी व साक्षीदार विलास बडदे हे दोघे जण जामीनदार होते. २००५ मध्ये किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकारी यांनी संगनमत करून शेलार यांना कंपनीतून काढून टाकले. त्यांना कंपनीतून मिळणाऱ्या ग्रॅच्युटीची तसेच इतर रक्कम त्यांचे बँकेचे ग्रुप लोन स्कीमचे थकित कर्ज न कट करता व त्याच्या बँकेच्या खात्यावर जमा न केल्याने आरोपी यांचे कर्ज परतफेड न झाल्याने फिर्यादी यांचे पगार खाते ब्लॉक करुन फिर्यादी व साक्षीदार यांना प्रत्येकी ६७ हजार ५०० रुपये शेलार यांचे कर्जाची थकीत रक्कम भरण्यास लावून फिर्यादी यांना विश्वासात न घेता फसवणूक केली. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी शेलार यांनी न्यायालयात दाद मागितल्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
---