साई स्ल्टीस्टेट सोसायटीच्या व्यवस्थापकांसह १४ संचालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:11 AM2021-01-23T04:11:49+5:302021-01-23T04:11:49+5:30

---------- शिरूर : .शिरूर येथील साई मल्टीस्टेट को- ऑप अँग्रीकल्चर सोसायटी लि. पारनेर या संस्थेच्या शिरूर शाखेत खातेदाराची ठेव ...

Crime against 14 directors including managers of Sai Slitistate Society | साई स्ल्टीस्टेट सोसायटीच्या व्यवस्थापकांसह १४ संचालकांवर गुन्हा

साई स्ल्टीस्टेट सोसायटीच्या व्यवस्थापकांसह १४ संचालकांवर गुन्हा

Next

----------

शिरूर :

.शिरूर येथील साई मल्टीस्टेट को- ऑप अँग्रीकल्चर सोसायटी लि. पारनेर या संस्थेच्या

शिरूर शाखेत खातेदाराची ठेव पावत्या घेऊन त्यांच्या बनावट सह्या करून त्यावर कर्ज काढून त्यांची ५२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी साई मल्टीस्टेट या संस्थेच्या चेअरमन, संचालक, मंडळ व्यवस्थापक यांच्यासह १४ जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अरविंद रामदास घावटे (वय ३६ वर्ष, रा.रामलिंग घोटीमळा ता. शिरूर जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी वसंत फुलाजी चेडे , दत्तात्रय सहादु सोनावळे , अशोक फुलाजी चेडे, गणेश रभाजी सांगळे, संदिप प्रभाकर रोहकले, उज्वला आप्पासाहेब नरोडे, रेखा संतोष घोरपडे, इंद्रभान हरीभाउ शेळके, विनायक सखाराम जाधव, ज्ञानेश्वर बाळासाहेब औटी, राजेंद्र अमश्तलाल दुगड, सुनिल अनंतराव गाडगे, प्रशाांत राजेंद्र बढे, श्रीकांत पोपट झावरे (सर्व राहणार पारनेर तालुका अहमदनगर) या संस्थेचे चेअरमन , उपाध्यक्ष यासह संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ,संस्थेचे शाखाधिकारी

यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरूर येथील साई मल्टीस्टेट को- ऑप अँग्रीकल्चर सोसायटी लि. पारनेर या संस्थेच्या शिरूर शाखेत चेअरमन यांनी अरविंद घवटे यांना ऑडीट आहे असे सांगून त्यांच्याकडून सप्टेबर २०२० मध्ये ठेव पावत्या जमा करून घेऊन त्या पावत्यावर अरविंद घवटे यांच्या नावावर गेल्या अडीच वर्षापूर्वी कर्ज काढल्याचे दाखविले. त्यासाठी खोटे ठेव पावती, कर्ज प्रकरण कागदपत्र तयार करून संस्थेचे चेअरमन, उपाध्यक्ष यासह संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ,संस्थेचे शाखाधिकारी यांनी आपसात संगनमत करून विश्वास घात केला. आणि संस्थेत ठेवलेल्या ६० लाखाच्या ठेव पावतीवर बनावट सहया करून, बनावट कागदपत्र वापरून ६०लाखाच्या ६० पावतीवर ८० टक्के प्रमाणे कर्ज काढुन ५२ लाख रूपयाचे रकमेचा अपहार केला.

याबाबत गुन्हा दाखल झाला आसून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहे.

Web Title: Crime against 14 directors including managers of Sai Slitistate Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.