भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या २० घरमालकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 12:25 AM2019-01-06T00:25:07+5:302019-01-06T00:26:41+5:30

सुनील पवार : तीन वर्षांचा कारावास

Crime against 20 Homeowners not providing information of tenants | भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या २० घरमालकांवर गुन्हा

भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या २० घरमालकांवर गुन्हा

Next

चाकण : आपल्या घरात राहणाºया भाडेकरूंची माहिती चाकण पोलीस ठाण्यात न देता शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चाकण परिसरातील २० घरमालकांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. भाडेकरूंची माहिती न दिल्यास तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा मिळू शकते, त्यामुळे आपल्या घरात ठेवलेल्या भाडेकरूंची त्वरित माहिती सादर करण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.

एकनाथ तबाजी शेळके (रा. जाधववाडी, चिखली), कमलेश ज्ञानेश्वर भोसले (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड), बाळासाहेब सोपान येळवंडे (रा. निघोजे, ता. खेड ), संदीप अमृता खराबी (रा. खराबवाडी, ता. खेड ), विशाल गेनभाऊ कांडगे (रा. मार्केट यार्ड जवळ, चाकण), सचिन जगन्नाथ क्षीरसागर (रा. बलुतं आळी, चाकण), संदीप जगन्नाथ क्षीरसागर (रा. धाडगे आळी, चाकण), श्रीराम रामसहाय विश्वकर्मा (रा. बलुतं आळी, चाकण), पप्पू बद्रिप्रसाद बघेल (रा. बलुतं आळी, चाकण), तुषार बाळासाहेब खराबी (रा. खराबवाडी, चाकण), संतोष बबन नाणेकर रा. नाणेकरवाडी, चाकण ), रामचंद्र भारू भोर (रा.अवसरी खुर्द, ता. आंबेगाव), अतुल बाळासाहेब गोरे (रा. मेदनकरवाडी, चाकण), रुपेश शांताराम जाधव (रा. नाणेकरवाडी, चाकण ), संदीप बाबूराव जाधव (रा. नाणेकरवाडी, चाकण ), नितीन गोरख घोजगे (रा. १४३, बुधवार पेठ, फरासखाना पोलीस स्टेशनच्या मागे, पुणे), सुदाम लक्ष्मण घोजगे (रा. जांबवडे, सुदुंबरे, ता. मावळ ), कैलास राघू बवले (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड ), निवृत्ती बाबूराव सरोदे (रा. सुखवानी पार्क, ग्रीन फिल्डजवळ, पिंपरी, पुणे), भीमा बबन पायगुडे (रा. सिद्धम पार्क, महाळुंगे इंगळे, ता. खेड ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाडेकरूंची नावे आहेत.
भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्याबाबत चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर परिषद व सर्व ग्रामपंचायतींना १५ दिवसांपूर्वी कळविले आहे. तसेच वर्तमानपत्रात ही प्रसिद्धी देण्यात आली आहे, तरी त्यास काहीही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाºयांचे फावते. उत्तर प्रदेश व बिहारमधून अनेक गुन्हेगारांनी गावठी बनावटीचे पिस्टल्स आणल्याने गुन्हेगारी वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी भाडेकरूंची माहिती देण्याबाबत आदेश काढले आहेत.
 

Web Title: Crime against 20 Homeowners not providing information of tenants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे