प्रतिबंधित क्षेत्र असतानाही ढोल-ताशा खेळल्याने ३०० जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:10 AM2021-05-08T04:10:07+5:302021-05-08T04:10:07+5:30

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोर शहराजवळ असलेल्या भोलावडे गावची काल यात्र होती. त्यामुळे गावातील काही उत्साही नागरिकांनी भैरवनाथ मंदिरासमोर ...

Crime against 300 people for playing drums despite being in a restricted area | प्रतिबंधित क्षेत्र असतानाही ढोल-ताशा खेळल्याने ३०० जणांवर गुन्हा

प्रतिबंधित क्षेत्र असतानाही ढोल-ताशा खेळल्याने ३०० जणांवर गुन्हा

Next

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोर शहराजवळ असलेल्या भोलावडे गावची काल यात्र होती. त्यामुळे गावातील काही उत्साही नागरिकांनी भैरवनाथ मंदिरासमोर ढोल-ताशा स्पिकर लावून खेळ खेळत होते. याची माहिती भोर पोलिसांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार सुभाष गिरे व पोलीस शासकीय वाहनासह भोलावडे गावात गेले. या वेळी गावातील मंदिरा समोरच्या चौकात २०० ते ३०० लोकांचा जमाव जमवून आझाद मंडळाचे सदस्य सांऊड व साहित्य वाजवताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी वादय, ढोल, ताशे, पिटी, लाईटींग साहित्य जप्त करण्यात आले. आणि नागरिकांना आपआपल्या घरी जाण्यास सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भोलावडे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. मात्र भोलावडे गावची यात्रा असल्याने नागरिकांनी मास्क न लावता, सुरक्षित अंतर न पाळता, कोरोना नियमाचे पालन न करता, जमाव जमवून नियमाचे उल्लंघन केल्यामुळे भोर पोलिसांनी ३०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime against 300 people for playing drums despite being in a restricted area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.