बेकायदा पाणी उचलल्याप्रकरणी ४६ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:37 AM2018-06-17T00:37:08+5:302018-06-17T00:37:08+5:30
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, को-हाळे बुद्रुक गावच्या हद्दीतील नीरा डाव्या कालव्यातून बेकायदा पाणी उचलले जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.
वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, को-हाळे बुद्रुक गावच्या हद्दीतील नीरा डाव्या कालव्यातून बेकायदा पाणी उचलले जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी ४६ शेतकºयांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : याबाबत महेश अशोक साळुंके (वय ३०, कालवा निरीक्षक वडगाव पाटबंधारे शाखा) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दि. १७ मार्च ते १५ जूनच्यादरम्यान नीरा डाव्या कालव्यामधील वितरिका क्रमांक ६ ब ते १६ फाट्यामध्ये प्रवाहित नीरा डाव्या कालव्यामध्ये या शेतकºयांनी अनधिकृतपणे व बेकायदेशीर प्रवाहित नीरा डाव्या कालव्यामधील पाण्यात सायफन टाक ले. त्याद्वारे नीरा डाव्या कालव्यातील पाणी त्यांच्या शेतातील विहिरीत, तळ्यात, डबक्यात नेऊन तेथून पुढे शेतीला देत असल्याचे वारंवार कृत्य करीत असताना आढळून आले होते.
पाटबंधारे विभागाकडून त्यांना वेळोवेळी तोंडी समज देण्यात
आली. तरीदेखील त्यांनी त्याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने शनिवारी(दि. १६) त्यांचे सायफनचे पंचनामे केले. यावेळी कालव्याच्या भरावाचे नुकसान केल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांच्याविरुद्ध सरकारतर्फे महाराष्ट्र सिंचन कायद्याप्रमाणे तक्रार दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
बिरू ठोंबरे, बबन कचरे, तात्याबा माळशिकारे, प्रदीप गायकवाड, महादेव पडळकर, राहुल नाझीरकर, उमाजी खोमणे, शंकर शिरवाळे, वसंत जाधव, अनिल शिंदे, शाम खोमणे, प्रशांत पवार, मारुती माळशिकारे, पांडुरंग ऊर्फ मनोहर पोमणे, बजाबा भगत, मनोहर वाबळे, वसंत जाधव, अरविंद माळशिकारे, संजय माळशिकारे, गणपत जाधव, मारुती भगत, नानासोा ढोपरे, बाळासोा साळुंके, इसाक शेख, बबन ढोपरे, दिलीप साबळे, आनंदराव गाडे, विजय वायसे, संपत नलवडे, प्रभाकर आडागळे (सर्व रा. कोºहाळे बु।।, ता. बारामती, जि. पुणे) शिवाजी पडळकर, अनिल वाबळे, संजय जायपत्रे, महादेव वाबळे, सुरेश वाबळे, बिपीन वाबळे, गणपत खंडेराव वाबळे, बाळासोा वाबळे, पोपट वाबळे, सचिन वाबळे, मारुती
वाबळे, आबासोा वाबळे, संपत
वाबळे, शिवाजी ठोंबरे (सर्व रा.
मुढाळे, ता. बारामती), श्रीरंग साळवे, मनोज साळवे (दोघेही रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) अशी
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
आहेत.