फसवणूकप्रकरणी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

By Admin | Published: May 12, 2017 05:24 AM2017-05-12T05:24:47+5:302017-05-12T05:24:47+5:30

सातारा शहर व जिल्ह्यातील १००हून अधिक जणांची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील २ डॉक्टरांविरुद्ध

Crime against cheating | फसवणूकप्रकरणी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

फसवणूकप्रकरणी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हडपसर : सातारा शहर व जिल्ह्यातील १००हून अधिक जणांची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील २ डॉक्टरांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासासाठी हडपसर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
डॉ. निरंजन वेताळ जाधव व डॉ. गणेश माने (दोघे रा. अ‍ॅमनोरा टाउनशिप, हडपसर) या दोघांवर फसवणूक व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी हिंमत बाजीराव कणसे (वय ५२, रा. विकासनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान ६ मे रोजी जाधव हे बेपत्ता झाल्याबाबातची तक्रार त्यांच्या पत्नने हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे.
२०१६मध्ये डॉ. जाधव व डॉ. माने यांनी ओझेरिच नावाची पहिली कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून फर्निचर, जीन्स पँट, भांडी, लेगीन्स, साड््य व इतर साहित्य खरेदी-विक्रीच्या डील सुरू केल्या. तसेच या योजनेत ज्यांना गुंतवणूक करावयाची आहे, अशांनी १० हजार रुपये हडपसर येथील बँकेत जमा केल्यास ३ महिन्यांमध्ये साहित्य खरेदी न करता २० हजार रुपये मिळतील असे सांगितले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा त्यासाठी त्यांनी उपयोग करून घेतला.
कंपनीकडून तुळशीचे बी देण्यास सुरुवात केली. त्यातून दर तीन महिन्याने वाढलेली तुळशीची रोपे डॉक्टर घेऊन जात व त्या बदल्यात भरघोस पैसे गुंतवणूकदारांना देत होते. त्यामुळे सातारा येथील तुळशीचे उत्पादन घेणाऱ्या लोकांचा कंपनीवर विश्वास बसला. त्यामुळे अनेकांनी या योजनेत गुंतवणूक केली. गुंतवणुकीचे पैसे डॉ. जाधव यांच्या खात्यावर लोकांनी भरले. सुरुवातीला या माध्यमातूनही काही लोकांना फायदा झाला. त्यामुळे मोठ्या रकमांची गुंतवणूक होत गेली. हा सर्व प्रकार सुरू असतानाच संशयित दोघांनी मार्च २०१७मध्ये दुसरी अमग्झ नावाची कंपनी काढली. या कंपनीचे सभासद होण्यासाठी २ लाख रुपयांचा शेअर व ट्रेनिंगसाठी ५० हजार रुपये भरण्यास सांगितले. रक्कम भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला कंपनी ४४ हजार रुपये या प्रमाणे असे ६ महिने देणार होती. मात्र वेळेत कोणतेही पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांना संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पुढील तपास गुन्हे पोलीस निरीक्षक अंजूमन बागवान करत आहेत.

Web Title: Crime against cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.