पाचशेच्या बनावट नोटा जमा केल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:16 AM2017-08-17T01:16:10+5:302017-08-17T01:16:12+5:30
पंजाब नॅशनल बँकेच्या शाखांमध्ये १000 रुपये दराच्या २0 आणि ५00 रुपयांच्या तीन भारतीय चलनाच्या जुन्या बनावट नोटा जमा केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
पुणे : पंजाब नॅशनल बँकेच्या शाखांमध्ये १000 रुपये दराच्या २0 आणि ५00 रुपयांच्या तीन भारतीय चलनाच्या जुन्या बनावट नोटा जमा केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील केळकर (वय ५९, रा. एनडीए रस्ता वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेच्या पुणे, नाशिक, औरंगाबाद, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांतील ७५ शाखांमधून कॅम्प येथील बँकेच्या करन्सी चेस्ट येथे जमा झालेल्या रकमेपैकी भारतीय रिझर्व्ह बँक नवी मुंबई यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर २0१६ मध्ये पाठविलेल्या करन्सीपैंकी १000 रुपये दराच्या २0 व ५00 रुपये दराच्या ३ अशा भारतीय चलनाच्या बनावट नोटा सापडल्या.