बांधकाम व्यावसायिकाकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:10 AM2021-03-31T04:10:55+5:302021-03-31T04:10:55+5:30
पुणे : हडपसर परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ...
पुणे : हडपसर परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मानवहित लोकशाही पक्षाचा पुणे जिल्हाध्यक्ष सोनू अण्णा सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका ३३ वर्षांच्या व्यावसायिकाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना २३ ते २७ मार्चदरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जागा विकसित करण्याचे काम करतात. त्यांना आरोपी सोनु ऊर्फ अण्णा सोनवणे असे नाव सांगणाऱ्याचा फोन आला. त्याने येथील परिसरात सामाजिक व राजकीय विभागात आपल्या मोठ्या ओळखी आहेत. तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता काम करता आहात, तुम्हाला येथे काम करायचे असेल तर आम्हाला १० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी त्याला खंडणी देण्यास नकार दिला. तेव्हा त्याने त्यांच्या प्लॉटिंगविरुद्ध सर्व महसूल कार्यालयात खोट्या तक्रारी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत़.