खंडणी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:14 AM2021-02-26T04:14:37+5:302021-02-26T04:14:37+5:30

रामकृष्ण माधव रेड्डी यांनी याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांकडे फियार्द दिली आहे. प्रवीण रूपराव ठाकरे (वय ३८, रा. मंत्रा ...

Crime against five persons in ransom case | खंडणी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

खंडणी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Next

रामकृष्ण माधव रेड्डी यांनी याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांकडे फियार्द दिली आहे. प्रवीण रूपराव ठाकरे (वय ३८, रा. मंत्रा रेसिडेन्सी, निघोजे, ता. खेड) कांबळे ( नाव-पत्ता पूर्ण नाही), सूरज पोतदार, गणेश (नाव-पत्ता पूर्ण नाही) त्यांचे अन्य दोन साथीदार (नाव-पत्ता नाही) यांच्यावर म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रवीण ठाकरे याला जेरबंद करण्यात आले आहे. इतर सर्व आरोपी फरारी असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : रामकृष्ण रेड्डी आणि प्रवीण ठाकरे हे दोघे जण रामा इंडस्ट्रीज (निघोजे, ता. खेड) येथील कंपनीत नोकरीस आहेत. कंपनीतील कामगार प्रवीण रूपराव ठाकरे याने घरबांधणीकरिता रेड्डी यांच्या कडून तीन लाख रुपये हात उसने घेतले होते. त्याबदल्यात तारण म्हणून चेक दिला होता. काही दिवसांनंतर पैसे परत मागितले असता प्रवीण ठाकरे याने पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्याने दिलेला चेक बँकेत भरला असता तो बाऊन्स झाल्याने रामकृष्ण रेड्डी यांनी प्रवीण ठाकरेच्या विरोधात न्यायालयात केस दाखल केली.

न्यायालयात केस दाखल केल्याचा राग मनात धरून प्रवीण ठाकरे याने कथित पत्रकार कांबळे, राजे प्रतिष्ठानचे सूरज पोतदार, गणेश व त्यांचे अन्य दोन साथीदार यांनी अनधिकृतपणे कंपनीत प्रवेश करून व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. व्यवस्थापक प्रिया भोसले यांच्याकडे कंपनीच्या कामकाजाची माहिती विचारून त्यांना शिवीगाळ केली. वाद मिटवण्यासाठी रामकृष्ण रेड्डी यांच्या वतीने ठेकेदार चौहान याने पत्रकार कांबळे याला फोन केला असता, प्रवीण ठाकरे याला दिलेले तीन लाख रुपये परत मागायचे नाहीत, अन्यथा कंपनीत माथाडी कामगार कंपनीत आणून कंपनीचे नुकसान करू, कंपनी बंद पाडू अशी धमकी दिली. पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Crime against five persons in ransom case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.