एजंटसह चार जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Published: September 20, 2014 12:12 AM2014-09-20T00:12:24+5:302014-09-20T00:12:24+5:30

परमीट नसतानाही आरटीओमधून परस्पर मीटर पासिंग करून घेऊन एजंटांनी रिक्षाचालकांना रिक्षाची विक्री केली.

Crime against four people with agent | एजंटसह चार जणांविरुद्ध गुन्हा

एजंटसह चार जणांविरुद्ध गुन्हा

Next
पुणो : परमीट नसतानाही आरटीओमधून परस्पर मीटर पासिंग करून घेऊन एजंटांनी रिक्षाचालकांना रिक्षाची विक्री केली. यामध्ये 2क् जणांची 45 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले. अखेर याप्रकरणी 5 जणांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
रिक्षाचालकांनी दागिने मोडून; तसेच उसनवार करून पैसे गोळा करून रिक्षा विकत घेण्यासाठी ते एजंटांकडे दिले. आरटीओ व डीलरच्या त्रुटींचा फायदा उचलत, ‘त्या’ एजंटांनी रिक्षाचालकांना हातोहात फसविले आहे. याप्रकरणी एजंट भूषण मोतीवाला (रा. कृष्ण रेसीडेन्सी, शिवणो), न्यू o्री अॅटोचे मालक माऊली बिराजदार, साई एंटरप्रायङोसचे अमोल मारणो, सागर अॅटो, रास्ता पेठ व अशपाक शेख या 5 जणांविरुद्ध कलम 42क्, 467, 468, 471, 31 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेले रिक्षाचालक सुरेश अण्णा यादव (वय 4क्, रा. गांधीनगर, येरवडा) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा प्रकार 7 जून ते 19 जुलै 2क्14 दरम्यान घडला. 
रिक्षाचालकाकडे परमीट नसतानाही डीलरला त्याला रिक्षा विकता येत नाही; मात्र एजंटांच्या शब्दावर विश्वास ठेवून रिक्षाच्या डीलरने परस्पर 2क् रिक्षा विकल्या. त्यानंतर आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षकांनी परमीट नसतानाही डोळे झाकून मीटर पास करून दिले. रिक्षा ताब्यात मिळाल्याने मोठय़ा विश्वासाने रिक्षाचालकांनी एजंटांकडे सोपविले. रिक्षासोबात कायमस्वरूपी परमीट हस्तांतर करून, देण्यासाठी त्यांनी एजंटकडे पैसे दिले. भूषण मोतीवाला, न्यू o्री अॅटो, साई एंटरप्रायझेस, सागर अॅटो, साई एंटरप्रायझेस यांच्याकडे हा प्रकार घडला. उपनिरीक्षक टी. एस. वाळके हे याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)
 
आरटीओच्या 
कारवाईचे काय?
परमीट नसताना डीलरकडून रिक्षा वितरित करण्यात आल्याचे आरटीओच्या निर्दशनास आणून देण्यात आल्यानंतर, त्यांनी तातडीने कारवाई करून, या 2क् रिक्षा जप्त केल्या आहेत. परमीट नसताना या रिक्षांचे मीटर पासिंग कसे झाले, तसेच त्यानंतर या रिक्षा रस्त्यावर आल्याच कशा, याची चौकशी मोटार वाहन निरीक्षकांमार्फत सुरू आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणामध्ये दोषी असणा:यांविरुद्ध कारवाई 
करू, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचे लक्ष आता आरटीओच्या कारवाईकडे लागले आहे.

 

Web Title: Crime against four people with agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.