अल्पवयीन मुलीस पळवल्याप्रकरणी गुन्हा

By admin | Published: December 28, 2016 04:24 AM2016-12-28T04:24:52+5:302016-12-28T04:24:52+5:30

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपावरून एक जणा विरुद्ध सोमवारी (दि. २६ ) रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Crime against kidnapping a minor girl | अल्पवयीन मुलीस पळवल्याप्रकरणी गुन्हा

अल्पवयीन मुलीस पळवल्याप्रकरणी गुन्हा

Next

इंदापूर : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपावरून एक जणा विरुद्ध सोमवारी (दि. २६ ) रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ऋषिकेश ज्ञानेश्वर शिंदे (रा. शेंडेचिंच, पोस्ट वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. सदर मुलीच्या वडिलांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलगी खेडेगावात राहते. इंदापूर महाविद्यालयात शिक्षण घेते. दि. २२ डिसेंबर रोजी तिला तिच्या वडिलांनी महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकीवरुन सोडले. ती गेली, मात्र दुपारपर्यंत परतली नाही. त्यावेळेपासून तिच्या घरातील लोक तिचा शोध घेत होते. दि. २५ डिसेंबर रोजी तुमची मुलगी आरोपीसमवेत मुदखेड रेल्वे स्थानकावर आढळून आल्याची नांदेड येथील रेल्वे पोलिसांनी, मोबाईलवरुन, मुलीच्या वडिलांना माहिती दिली. तेथे जावून वडीलांनी मुलीला परत आणले. आपली मुलगी अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेवून, तिला लग्नाचे आमिष दाखवून, आरोपीने फूस लावून पळवून नेले. तीन दिवस ताब्यात ठेवून तिचा विनयभंग केला, अशी तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला. आरोपी हा मुलीच्या नात्यातील कुटुंबाच्या ओळखीचा आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवून दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता, इंदापूरहून एसटी बसने, सोलापूरला नेले. तेथून रेल्वेने रात्री दहा वाजता ते हैदराबादला गेले. रात्रीच तिरुपतीला जाणारी बस या दुसऱ्या दिवशी तिरुपती येथील भक्तीनिवासात मुक्काम केला. दि.२४ डिसेंबरला पहाटे रेल्वेने निघून, दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता हे दोघे जण मुदखेड येथे पोहोचले. ते संशयास्पद रीत्या फिरत असल्याचे पाहून रेल्वे पोलीसांनी त्यांची चौकशी केली. त्यांना ताब्यात घेतले.

वडिलांनी लग्नाला दिला नकार
४सदर ठिकाणी मुलाचे ही वडील आले होते. त्यांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला. मुलगा त्याच्या घरी, तर मुलीला घेवून तिचे वडील इंदापूर पोलीस ठाण्यात आले.

Web Title: Crime against kidnapping a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.