एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:53+5:302021-04-21T04:10:53+5:30

तरुणी व तिच्या मित्राला अडवून केली मारहाण लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करून तिला व ...

A crime against a person who harasses a young woman out of one-sided love | एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्यावर गुन्हा

एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्यावर गुन्हा

Next

तरुणी व तिच्या मित्राला अडवून केली मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करून तिला व तिच्या मित्राला अडवून बेदम मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून नेणाऱ्या तिघांवर कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका २४ वर्षांच्या तरुणीने कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कोथरूडमधील मयूर कॉलनीत सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता घडली. कृष्णा डोंगरे व त्याच्या दोन साथीदारांवर विनयभंग, जबरी चोरी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी डोंगरे याचे फिर्यादी तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. गेल्या काही दिवसांपासून तो तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. त्याने या तरुणीला प्रेमाबाबत विचारल्यावर तिने त्याला नकार देऊन तू आवडत नसल्याचे वारंवार सांगितले होते. तरीही तो तिचा पाठलाग करीत असे.

ही तरुणी व तिचा मित्र १८ एप्रिल रोजी मयूर कॉलनीतील जोग शाळेजवळून जात असताना त्याने व त्याच्या दोन मित्रांनी त्यांना अडविले. त्यांना शिवीगाळ करून फिर्यादीच्या डोक्यास, पोटास व तिच्या मित्रास हाताला व डोक्यात मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम असा ७ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. कोथरूड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A crime against a person who harasses a young woman out of one-sided love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.