निवडणूक पोल सादर केल्याप्रकरणी गुन्हा
By admin | Published: February 20, 2017 02:33 AM2017-02-20T02:33:33+5:302017-02-20T02:33:33+5:30
निवडणूक मतदान संपेपर्यंत निवडणूक ओपिनियन पोल घेणे आणि त्याअंतर्गत निष्कर्ष जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने
जुन्नर : निवडणूक मतदान संपेपर्यंत निवडणूक ओपिनियन पोल घेणे आणि त्याअंतर्गत निष्कर्ष जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली असताना ओपिनियन पोल घेत निष्कर्ष जाहीर केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात आणि poll.pollcode.com , WWW.boardhost.com या संकेतस्थळावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या धालेवाडीतर्फे हवेली-सावरगाव गटातील उमेदवार यांचा ओपिनियन पोल घेतला जात आहे. त्याचे निष्कर्ष आॅनलाईन जाहीर केले जात असल्याचे या गटाचे भरारीपथक प्रमुख तथा अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी के. डी. भुजबळ यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संकेतस्थळावर शोध घेतला असता त्यांना हा प्रकार खरा असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी संकेतस्थळाच्या काही पेजचे स्क्रीन शॉट घेतले असून ते पुरावा म्हणून वापरले जाणार आहेत. या प्रकरणात सायबर सेलची मदत घेतली जाणार आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. भुजबळ यांनी या प्रकरणी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.